सध्या बॉलिवूडमध्ये लगीनसराई सुरू आहे. मागील महिन्यात अभिनेत्री कॅटरीना कैफ (katrina kaif) आणि अभिनेता विक्की कौशल (vicky kaushal), अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन यांचा विवाह झाला. यानंतर आता अभिनेत्री करिश्मा तन्नाचा नंबर लागला आहे. पुढच्याच महिन्यात करिश्मा लग्नबंधनात अडकणार आहे. (karishma tanna marriage)
अभिनेत्री करिश्मा (karishma tanna) ही मुंबईचा उद्योगपती बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्न करणार आहे. त्यांचे लग्न ५ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. यांच्या लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे. ४ फेब्रुवारीपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. पहिल्या दिवशी मेहंदी आणि संगीत सोहळा होणार आहे. त्यानंतर ५ फेब्रुवारीला हळदी आणि लग्न हे दोन्ही कार्यक्रम होणार आहे. असे असून ही दोघांनी अजूनही लग्नाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण बातमी अशी आहे की, दोघांचे लग्न खूप खास पद्धतीने होणार आहे. यासाठी दोन्ही पक्षातील कुटुंबियानी खास तयारी देखील केली आहे.
करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांचा विवाह दोन विधींनी संपन्न होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, लग्न गुजराती आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे. खरंतर, करिश्मा गुजराती आहे. त्यामुळे लग्नाचे विधी गुजराती पद्धतीने पार पडणार आहेत. त्याचबरोबर, वरुण हा बंगलोर, कर्नाटकचा आहे. त्यामुळे करिश्माला दोन्ही पद्धतीने लग्न करायचे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करिश्माच्या एका मित्राने माहिती देत सांगितले आहे की, करिष्मा मागील काही दिवसांपासून तिच्या लग्नाचे कपडे प्लॅन करत आहे. करिश्माला तिच्या भावी पती आणि सासरसाठी काहीतरी खास करायचे आहे. त्यामुळे तिने लग्नात घालण्यासाठी कांजीवरम साडी घेतली आहे. ज्यावर सोन्याचे नक्षीकाम केले आहे. यासोबतच तिने अधिकच सुंदर दिसण्यासाठी दक्षिण भारतीय शैलीतील दागिनेही खरेदी केले आहेत. करिश्मा ही साडी तिच्या पाठवणीच्या वेळेस नेसणार आहे.
त्याचबरोबर करिश्मा आणि वरुणच्या लग्नात कोरोनाचे देखील भान ठेवले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा पाहुण्यांची यादी तयार केली आहे. असे म्हंटले जात आहे की, दोघांनाही हे लग्न मित्र आणि नातेवाईकांसोबत मोठ्या थाटामाटात करायचे होते, त्यासाठी त्यांनी तसे नियोजनही केले होते, परंतु कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते पाहता हे सर्व नियोजन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन पाहुण्यांची यादी ५० पर्यंत कमी करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर, करिश्माने आपल्या मित्र मैत्रिणीसाठी बॅचलरेट पार्टीचीही योजन देखील केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा प्लॅन कॅन्सल होण्याची शक्यता आहे. करिश्मा आणि वरुणच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, सुमारे दीड वर्षापूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांची ओळख मैत्रीमध्ये रुपांतरीत झाली. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात परिवर्तन झाले. हे दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी ही १२ नोव्हेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता.
महत्वाच्या बातम्या
YouTube Shorts मधून कमवा महिन्याला ७.५ लाख रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
नऊवारी नेसून मारली आकाशातून उडी; तिरंग्याला सलामी देत पुण्याच्या शीतल महाजनचा राष्ट्रीय विक्रम
RRB Group D च्या विद्यार्थ्यांसोबत सरकारने रातोरात काय फसवणूक केली? जाणून घ्या का पेटलाय वाद..
दीपिका पादुकोनने उघड केले रणवीर सिंगचे बेडरूममधील रहस्य; म्हणाली, बेडवरच जास्त वेळ..