सेलिब्रिटी त्यांच्या कपड्यांमुळे आणि त्यांच्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. जेव्हा जेव्हा सेलिब्रिटी सार्वजनिकपणे समोर येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या फॅशन सेन्समुळे किंवा त्यांच्या वागण्यामुळे त्यांना ट्रोल केले जाते. अनेकदा नेटकरी ट्रोल करताना त्यांच्या खाजगीबाबीही बोलून जातात. (karina kapoor preganant)
करीना कपूरही अनेकदा व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ती बऱ्याचदा तिच्या मुलांमुळेही चर्चेत येत असते. त्यामुळे अनेकदा तिला नेटकरी ट्रोल करत असतात. आता करीना पुन्हा एकदा ट्रोलर्स निशाण्यावर आली आहे. नेटकऱ्यांनी आता तर तिला थेट प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे.
करीना कपूर खान बुधवारी, १६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये करीना कपूरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण व्हिडिओमध्ये दिसत आहे की तिचे वजन वाढलेले आहे.
एका यूजरने लिहिले की, ‘बेबोला पुन्हा फिटनेस गोल करण्याची गरज आहे, तिचे वजन खूप वाढले आहे’, तर दुसरा म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते की, जेव्हा ती तैमूरनंतर अधिक फिट आणि बोल्ड होती, आता तिला काय झाले?’ त्याचबरोबर काहींनी तर करिना आता इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही म्हटलं आहे.
अनेकांनी तर ट्रोल करताना हद्दच पार केली आहे. एकाने म्हटले की बेबो तिसऱ्यांदा प्रेग्नंट झाली की काय? तिच्या पोटामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तसेच अनेकांनी तिच्या फिटनेसवर भाष्य केले आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
करिनाने २०२२ ची सुरुवातीपासून फिट राहण्याचे ठरवले होते. पण त्यानंतर ती काही आपल्या फिटनेसवर लक्ष देताना दिसत नाहीये. ३ जानेवारी रोजी करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर क्रोइसंट खाताना तिचा सेल्फी शेअर केला. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर खान ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर खानसोबत दिसणार आहे. अलीकडेच त्याची रिलीज डेट ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
बेव सिरीजच्या नावाखाली बटल्यांनी मॉडेलसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य; मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
विवाहित महिलेचे जडले १७ वर्षाच्या मुलावर प्रेम, शारीरीक संबंध बनवले अन्…; महाराष्ट्र हादरला
माकडांचा धुमाकूळ! ईव्हीएम कंट्रोल रुम परिसरातील ३४ सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, अधिकाऱ्यांना बसला धक्का