बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा आगामी ‘विक्रमवेधा’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान चित्रपटातील सैफ अली खानचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ह्रतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर सैफ अली खानचा हा लूक शेअर केला आहे. (kareena kapoor on saif ali khan new look)
ह्रतिकने शेअर केलेल्या फोटोत सैफ अली खान खूपच डॅशिंग अंदाजात दिसत आहे. जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, दाढी-मिशा आणि डोळ्यांवर चश्मा अशा अंदाजात तो खूपच डॅशिंग दिसत आहे. सैफ अली खानचा हा लुक पाहून त्याची पत्नी करीना कपूर सुद्धा हैराण झाली आहे.
करीना कपूरनेही आता सैफ अली खानचा ‘विक्रम’ लुक शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने सैफ अली खानचे खूप कौतुक केले आहे. तिने म्हटले की, माझा नवरा आधीपेक्षाही जास्त होत दिसायला लागला आहे. मी जास्तवेळ या चित्रपटाची वाट नाही बघू शकत.
यापूर्वी विक्रमवेधा चित्रपटातील ह्रतिक रोशनचा पहिला लूक जारी करण्यात आला होता. ह्रतिकच्या वाढदिवशी त्याचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. ह्रतिक रोशननेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील त्याचा हा लूक शेअर केला होता. त्याच्या या लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले होते.
दरम्यान, विक्रमवेधा हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट विक्रमवेधाचा रिमेक आहे. हा चित्रपट म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे जो वेधा नावाच्या एका कुख्यात गँगस्टरला मारण्याची योजना करतो. तमिळमध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते.
तमिळ विक्रमवेधा चित्रपटात आर माधवन विक्रम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची तर विजय सेतुपतीने एका कुख्यात गँगस्टरची भूमिका साकारली होती. तर आता हिंदीत रिमेक करण्यात येणाऱ्या चित्रपटात सैफ अली खान विक्रम तर ह्रतिक रोशन वेधा ही भूमिका साकारत आहे.
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मापेक्षा घातक असलेल्या युवा फलंदाजाला BCCI ने डावलले; कारकीर्द संपण्याच्या मार्गावर?
ठाकरे सरकारचा जोरदार पलटवार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
तरूण शेतकऱ्याने शेतात मोती पिकवत कमावला तुफान पैसा; पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक






