सध्या मनोरंजन क्षेत्रात असे अनेक शो आहेत, जे मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत. इतकेच नव्हे तर या शोने चाहत्यांचे नेहमी मनोरंजन केले आहे. यामध्ये कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (the kapil sharma show) हा आहे. या शोने चाहत्यांना खूप हसवले आहे. त्याचबरोबर या शोमधील कलाकार देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ चा होस्ट कॉमेडियन कपिल शर्मा (kapil sharma) हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. (kapil sharma goes to shahrukh khan’s house midnight)
हे यश मिळवण्यासाठी कपिलने अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक शो प्रसिद्ध झाला आहे. हा शो कपिल शर्माचा स्टँड अप शो ‘आय एम नॉट डन येट’हा आहे. या शोचा टिजर प्रदर्शित झाल्या पासूनच खूप चर्चा सुरू आहेत. तसेच हा ‘द कपिल शर्मा शो’ पेक्षा वेळा असल्याचे त्याने प्रमोशन दरम्यान सांगितले. कपिलला या शो च्या माध्यमातून आपल्या जोक्सने सर्वांना हसवायचे आहे.
त्याचबरोबर या शोच्या माध्यमातून तो स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टींचा ही खुलासा करणार आहे. याच दरम्यान कपिल शर्माने शोच्या माध्यमातून किस्साही उघड केला आहे. ही घटना बॉलिवूडचा किंग खान उर्फ शाहरूख खानशी (shahrukh khan) संबंधित आहे. त्याचे झाले असे की, कपिल शर्मा त्याच्या नातेवाईकासोबत गाडीतून जात होता. त्याचवेळी त्याची गाडी शाहरुख खानच्या घराजवळून जात होती. तेव्हा त्याच्या नातेवाईकांना शाहरुखचे घर पाहायचे होते.
त्यादरम्यान मध्यरात्रीचे ३ वाजले होते. तेव्हा शाहरुख खानच्या घरी पार्टी सुरू होती. आणि या पार्टीला कपिल शर्माला आमंत्रण दिले नव्हते. तरी देखील कपिल शाहरूखच्या घरी पोहोचला होता. कारण तेव्हा तो नशेत होता आणि त्याने नातेवाईकाची ही गोष्ट ऐकली. गेटमधून गाडी आत घेण्यास ड्रायव्हरला सांगितले. यादरम्यान कपिलने आपल्या पॉवरचा चुकीचा फायदा घेतला.
कपिल शर्मा पुढे म्हणाला की, आम्ही तिथे गेलो. तेव्हा शाहरुख खानच्या घरी पार्टी सुरू होती. दरवाजे उघडे होते. तेव्हा मी माझ्या ओळखीचा फायदा घेतला. आणि ड्रायव्हरला सांगितले की, गाडी आत घे. सिक्युरिटी गार्डनी मला पाहिले आणि आत सोडले. त्यांना असे वाटले की मलाही या पार्टीचे आमंत्रण आहे.”
तसेच कपिल पुढे म्हणाला की, “मला तेव्हा जाणवले की, आपण आपल्या पॉवरचा गैरफायदा घेतला. मला वाटतं होतं की आपण इथून जायला पाहिजे. तेव्हा तिथे शाहरुख खानचा खास व्यक्ती तिथे आला. जेव्हा गेट उघडले तेव्हा गौरी खान यादेखील त्यांच्या मैत्रिणीसोबत तिथे बसल्या होत्या. त्यांना ही असे वाटले की, आम्हाला शाहरुख खानने बोलावलं आहे. मी त्यांना ‘हॅलो’ बोलो त्या मला म्हणाल्या की, ‘शाहरुख आतमध्ये आहे. ’मी आतमध्ये गेलो तेव्हा शाहरुख खान आपल्या अंदाजात डान्स करत होते.
त्याचबरोबर कपिल पुढे म्हणाला की, मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो की, भाई माफ करा. गेट उघडे होते म्हणून मी आत आलो. त्यावर शाहरुख खान कपिल शर्माला पुढे म्हणाला की, उद्या जर माझ्या खोलीचे दार उघडे दिसले तर तू काय आतमध्ये येणार का? तसेच कपिल पुढे म्हणाला की, शाहरुख खान माझ्यावर नाराज नव्हते.
त्यानंतर जेव्हा पार्टी संपली तेव्हा शाहरुख खान कपिल शर्माला सोडायला गाडीपर्यंत आला होता. कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या ‘द कपिल शर्मा शो’ होस्ट करत आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून हा शो तो होस्ट करत आहे. तसेच त्याने ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
महत्वाच्या बातम्या
नितेश राणेंचा कोठडीतील ‘तो’ फोटो तूफान व्हायरल, जाणून घ्या फोटोमागच खरं सत्य
budget 2022: मोबाईल फोन चार्जरसोबत या गोष्टी झाल्या स्वस्त, वाचा कोणत्या वस्तू झाल्यात महाग..
झाडाचा बुंधा की मोठा खड्डा? मंगळावरील तो रहस्यमयी फोटो पाहून सगळेच झाले चकीत
“उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आचार विसरू नका, तरूण पिढीला व्यसनाधिन करू नका”