भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीबाबत वक्तव्य केलं आहे. विराटने लवकरात लवकर फॉर्ममध्ये यावे, असे कपिल देव यांचे म्हणणे आहे. विराट कोहलीला जवळपास एक महिन्याची सुट्टी मिळाली आहे, कारण तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही.
विराट आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये असेल आणि आशिया कप 2022 मध्ये थेट दिसणार आहे. कपिल देव एबीपी न्यूजवर म्हणाले, “गेल्या पाच-सहा वर्षांत विराट कोहलीशिवाय भारत खेळला नाही असे नाही, पण असा खेळाडू फॉर्ममध्ये यावा अशी माझी इच्छा आहे. त्याला वगळण्यात आले असेल किंवा विश्रांती देण्यात आली असेल. हे मान्य आहे, पण त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.” विराटने जिथेही खेळावे तिथे चांगले रन्स करावे आणि आत्मविश्वास परत आणावा असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे.
कपिल देव पुढे म्हणाले की, “रणजी करंडक खेळा किंवा कुठेही धावा करा पण आत्मविश्वास परत आणण्याची गरज आहे. महान आणि चांगल्या खेळाडूमध्ये हाच फरक आहे. त्याच्यासारख्या महान खेळाडूला पुन्हा फॉर्ममध्ये यायला एवढा वेळ लागू नये. त्याला स्वताशी लढावे लागेल आणि गोष्टी सुधाराव्या लागतील.
गेल्या आठवड्यात कपिल देव म्हणाले होते की, जर रविचंद्रन अश्विनसारख्या गोलंदाजाला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर कोहलीलाही वगळले जाऊ शकते. कपिल देव म्हणाले की, जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी कोहलीने आपल्या जुन्या अवतारात परत येण्यासाठी अधिक सराव करावा आणि सामने खेळावेत.
ते म्हणाले होते की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोहलीसारखा खेळाडू फॉर्ममध्ये कसा परत येऊ शकतो? तो सामान्य क्रिकेटर नाही. त्याने अधिक सराव केला पाहिजे, जुन्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी अधिक सामने खेळले पाहिजेत. मला तसे वाटत नाही. सध्या टी-20 मध्ये कोहलीपेक्षा मोठा खेळाडू नाही, पण जेव्हा तुमची कामगिरी चांगली नसेल तेव्हा निवडकर्ते त्याच्यावर विचार करू शकतात.
कपिल पुढे म्हणाले की, माझी विचारसरणी अशी आहे की जर कोणी चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला विश्रांती दिली जाऊ शकते किंवा वगळले जाऊ शकते. विराट कोहलीसारख्या खेळाडूला वगळावे असे मी म्हणू शकत नाही. तो एक मोठा खेळाडू आहे. सन्मान म्हणून विश्रांती घेतली, तर त्यात काही चूक नाही, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
पत्रकार घेत होता फिरकी, सुर्यानेही शक्कल लढवत असे उत्तर दिले सगळ्यांना आले हसू, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंकडून ‘या’ दिग्गज नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; एक कोकणाचा तडफदार चेहरा तर दुसरा विदर्भाची शान
..अन् शहनाज गिलला पाहताच मुलगी झाली बेभान, गळ्यात पडून ढसाढसा पडली, पहा व्हिडीओ
PHOTO: मलायकाने बॉयफ्रेंडसोबत जाण्यासाठी निवडला बोल्ड ड्रेस, ब्राशिवाय घातला ट्रांसपरंट टॉप