Share

मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपुरमध्ये दंगल; नमाज पठणानंतर रस्त्यावरच राडा, तुफान दगडफेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कानपूर दौऱ्यावर आहे. असे असताना कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद साहिब यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून शुक्रवारच्या नमाजनंतर कानपूरमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. (kanpur riots video viral)

नमाजानंतर त्याठिकाणी दगडफेक सुद्धा झाली आहे. दगडफेकीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, लाठीचार्ज आणि अनेक राऊंड हवेत गोळीबार केला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे, मात्र अरुंद रस्त्यांवरून दगडफेक सुरूच आहे.

पोलिस जिथे जातात तिथे दगडफेक थांबते पण ती हटवताच पुन्हा दगडफेक सुरू होते. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूर ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे संपूर्ण परीसरात चिंतेचे वातावरण आहे.

मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या भागात नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली. यानंतर यतीमखाना येथील सद्भावना चौकीजवळील बाजार बंद करण्यासाठी दोन्ही बाजू समोरासमोर आल्याने दगडफेक सुरू झाली.

पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. लोक अरुंद रस्त्यावर घुसले आणि दगडफेक करू लागले. जोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याचा व्यापक परिणाम दिसून आला.

आज सकाळपासून चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हिरामण पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड, बाबू पूर्वा, रावतपूर आणि जाजमाऊ या भागात आंशिक किंवा पूर्ण बंद दिसून आला. तसेच याठिकणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही करण्यात आला होता.

बहुतेक मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोहम्मद साहिबांबाबत केलेली कोणतीही अनुचित टिप्पणी खपवून घेणार नाही, असे सांगण्यात आले. पोलिसांनी कोणत्याही भागात नमाज पठण केल्यानंतर लोकांना आंदोलन करू दिले नाही, मात्र लोक रस्त्यावर आले. त्यानंतर त्यांनी गदारोळ सुरु केला होता. याप्रकरणी पोलिसांनी १५ लोकांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मॅच पाहण्यासाठी आलेल्या तरूणीवरच भाळला ‘हा’ भारतीय क्रिकेटर, सात दिवसांत केलं होतं लग्न
मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच तू.., लग्न होताच दीपक चाहरची पत्नीसाठी खास पोस्ट
प्रियकराशी लग्न करण्यासाठी ती बांगलादेशहून भारतात पोहत आली, लव्हस्टोरी वाचून चक्रावून जाल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now