‘बेबी डॉल’ आणि चिटीया कलाईया’ सारख्या सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारी गायिका कनिका कपूरने इंडस्ट्रीत एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, ही उंची गाठण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एक वेळ अशी होती की मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते. पण आज ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. (kanika kapoor property)
कनिका कपूरने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओच्या एका कार्यक्रमात परफॉर्म केला होता. याशिवाय तिने अनूप जलोट यांच्यासोबत अनेक भजनही गायले आहेत. कनिकाला म्युझिक इंडस्ट्रीत ओळख मिळाली ती ‘बेबी डॉल’ या गाण्याने. यानंतर तिने अनेक हिट गाणी दिली. आता तिच्या गाण्यांना देशातच नाही तर परदेशातही पसंती मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरची एकूण संपत्ती ७ ते ८ कोटी रुपयांची आहे. याशिवाय एका गाण्यासाठी ती १५ ते २० लाख रुपये घेते. कनिका कपूरने तिच्या आवाजासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही लोकांना वेड लावले आहे. इंस्टाग्रामवर तिचे १० मिलियन फॉलोअर्स आहेत.
कनिका दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर कनिका डिप्रेशनची शिकार झाली होती. तीन मुलांना एकट्याने सांभाळणे तिला कठीण जात होते. एवढेच नाही तर एकदा शाळेची फी न भरल्यामुळे तिच्या मुलांना शाळेतूनही काढण्यात आले होते.
कनिका हिचे लग्न अगदी लहान वयात झाले होते. त्यावेळी ती १८ वर्षांची होती. तिने एका एनआरआय व्यावसायिकाशी लग्न केले. मात्र, काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी कनिका तीन मुलांची आई झाली होती. त्यावेळी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण तिने कधीही आयुष्यात हार मानली नाही.
कनिकाला आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तिने त्यांचा सामना केला आहे. आज कनिका तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. तिने बिझनेसमन गौतम हथिरामनसोबत दुसरे लग्न केले आहे. तिने नुकतेच लग्न केले असून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील भोसलेंना त्यांचा ‘व्हाईट हाऊस’ सोडावा लागणार? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
उमरानला हलक्यात घेतीये साऊथ आफ्रिकेची टीम, म्हणाली, ‘अशा गोलंदाजांसोबत लहानपणापासून खेळतोय’
रस्त्यावर दिसताच केकेला लोकं विचारायचे, तो तुच आहेस ना ‘तडप-तडपवाला?’ वाचा अविस्मरणीय किस्सा