Share

कन्हैया कुमारवर काँग्रेसच्या कार्यालयात घुसून शाईफेक; शाई फेकणाऱ्याला पकडून केली मारहाण

मंगळवारी लखनऊमध्ये काही लोकांनी कन्हैया कुमारवर (kanhaiya kumar) शाई फेकली. काँग्रेस (congress) मुख्यालयात ही घटना घडली. लखनौ सेंट्रल मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सदफ जफर यांच्या उमेदवारी अर्जात सहभागी होण्यासाठी कन्हैया कुमार आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्यालयात घुसून शाई फेकण्यात आली.

शाई फेकणारा कोण होता आणि शाई का फेकली गेली? हे कळू शकलेले नाही. त्यानंतर फेकलेली शाई नसून एक प्रकारचे अॅसिड असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मात्र, कन्हैया कुमारला अंगावर शाई उडालीच नाही. शाई फेकली जात असताना काही थेंब शेजारी उभ्या असलेल्या ३-४ तरूणांवर पडले आणि कन्हैया कुमार बचावला.

कन्हैया कुमार हा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहे. शाई फेकणाऱ्याला काँग्रेसवाल्यांनी पकडून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर काँग्रेस मुख्यालयात बराच वेळ गदारोळ झाला. काँग्रेस उमेदवार सदफ जफर ह्या अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कन्हैया कुमार पोहोचला होता.

प्रचारासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारवर यावेळी शाई फेकण्यात येईल असे कोणालाही वाटले नव्हते. लखनौ सेंट्रल मतदारसंघातून सदफ जफर निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सदफ जफर हे मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौचे आहेत. ती व्यवसायाने शिक्षिका आणि अभिनेत्री आहे.

सध्या त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत काँग्रेसशी जोडल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे सदफ जफर यांनी चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांच्या ‘अ सुटेबल बॉय’ या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सध्या त्या आपल्या दोन मुलांसह लखनौमध्ये राहतात.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौमधून अटक देखील केली होती. दंगल आणि हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर सदफ जफर सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. दरम्यान कन्हैया कुमारवर झालेल्या शाईफेकीनंतर अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या
अक्षय कुमारने अफेअरच्या बहाण्याने रवीनाचा केला होता वापर; म्हणाली, एक नाही तर तीन-तीन वेळा..
‘या’ १९ वर्षीय मुलासमोर जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीनेही जोडले हात, वाचा काय आहे प्रकरण
मुलाला तिकीट न मिळाल्याने माजी मंत्र्याला बसला जबर धक्का, त्यातच झाले निधन

राजकारण

Join WhatsApp

Join Now