Share

रात्री नवाजच्या घरी पांढरी साडी घालून आली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

चित्रपटसृष्टीत २२ वर्षांहून अधिक काळ घालवलेल्या नवाजकडे आज नाव, प्रसिद्धीसोबतच आलिशान घरे, महागडी वाहने आहेत. अशात बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या नवाजने नुकतंच मुंबईत आपल्या स्वप्नातलं घर बनवलं आहे. नवाजने आपल्या घराचे नाव ‘नवाब’ असे ठेवले आहे. (kangana visit nawazuddin news house)

गेल्या काही दिवसांपासून नवाज त्याच्या नव्या घरामुळे चांगलाच आला आहे. नवाजने नवा बंगला घेतल्यामुळे त्याने त्याच्या बंगल्यावर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचे अनेक मित्र उपस्थित होते. तसेच यापार्टीत इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

आता विरल भयानीने नवाजुद्दीनच्या पार्टीचा एक व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नवाजसोबत कंगना आणि अवनीत कौर फोटोग्राफर्सना पोज देताना दिसत आहेत. या पार्टीत कंगनाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये ती खुपच सुंदर दिसत होती.

पार्टीदरम्यान कंगनाचा ड्रेसिंग सेन्स एकदम अनोखा होता. तसेच तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा नेकलेस आणि साडीसोबत व्हाईट सँडल घातले होते. तसेच तिने लाल रंगाची लिपस्टिक लावलेली होती. या लूकमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत होती.

कंगनाचा हा लूक लोकांना इतका आवडला आहे की चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. एका सोशल मीडिया यूजरने कमेंट करताना लिहिले की, कंगना तू या लूकमध्ये जबरदस्त दिसत आहेस. तर दुसर्‍याने लिहिले, वाह नवाज भाई, तुम्ही कंगनाला तुमच्या पार्टीत आमंत्रित करुन खुप भारी काम केले. तर एकाने कंगनाला चांदनी म्हटले आहे.

दरम्यान, अभिनेता नवाज लवकरच त्याच्या आगामी ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात टीव्ही स्टार ‘अवनीत कौर’सोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर करत आहेत. कंगनाच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता 93वा वाढदिवस
नितेश राणेंना दणका! कोर्टानं दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
खराब फॉर्ममुळे ‘या’ स्टार खेळाडूची भारतीय संघातून होऊ शकते हकालपट्टी; रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now