Share

कंगनाने केले भाजपाचे आणि योगींचे तोंडभरून कौतुक; म्हणाली, ‘ना लग्न, ना मुलं, ना सत्तेचे भोगी, ज्यांना..

Kangana Ranaut

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने चार राज्यात घवघवीत यश मिळवले. विशेषतः उत्तरप्रदेशमध्ये (UP Election 2022) काय होणार? कोणाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर भाजपने या निवडणूकीत बहुमत मिळवत युपीत दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. तसेच या विजयाद्वारे योगी आदित्यनाथ यांना दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. यादरम्यान भाजप आणि योगी आदित्यनाथ यांच्या विजयाने अभिनेत्री कंगना राणावत(Kangana Ranaut) खुश झाली आहे. तिने सोशल मीडियाद्वारे आपला हा आनंद व्यक्त केला आहे.

कंगनाने गुरुवारी तिच्या इन्स्टा स्टोरीला एक पोस्टर शेअर केली. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असून मागे भाजप समर्थक झेंडा पकडलेले दिसत आहेत. या फोटोवर लिहिलेले आहे की, ‘ना लग्न, ना मुले, ना सत्तेचे भोगी.. ज्यांना पाहून घाबरतात गुंड… ते आहेत उत्तरप्रदेशचे योगी…’

हा पोस्टर शेअर करत कंगनाने उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा विजय मिळवल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. दरम्यान, कंगना कोणत्याही मुद्द्यावर बिनधास्तपणे आपले मत मांडत असते. तसेच ती नेहमी भाजप पक्षाला पाठिंबा देतानाही दिसून येते.

कंगनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास सध्या ती ‘लॉक अप’ या शोमुळे चर्चेत आहे. एकता कपूरद्वारा निर्मित हा शो कंगना होस्ट करत आहे. २७ फेब्रुवारीपासून हा शो सुरु झाला असून तो एमएक्स प्लेयर आणि अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येत आहे. याशिवाय कंगना ‘तेजस’, ‘धाकड’ यासारख्या चित्रपटातही दिसणार आहे.

दरम्यान, भाजप पक्षाने उत्तरप्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. ऐंशीच्या दशकानंतर या राज्यात अशी संधी कोणत्याच पक्षाला मिळाली नाही. पण भाजपने हे यश मिळवले असून योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे हे भाजपचे अभूतपूर्व यश आहे, असेच म्हणावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या :
नवज्योतसिंग सिद्धूंसारख्या दिग्गज नेत्याला हरवणाऱ्या ‘पॅड वूमन’ जीवन ज्योत कौर कोण आहेत?
नेहमी हॉटेलच्या रुममधून चॉकलेट चोरतो शाहरूख खान, त्यानंतर करतो ‘हे’ काम, स्वताच केला खुलासा
‘योगी को PM बनाएंगे’, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष; एका झटक्यात योगींची हवा पसरली देशभरात

बाॅलीवुड मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now