Share

कंगना राणावतने सीतेच्या भूमिकेसाठी घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, ठरली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री

बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. अनेकदा कंगना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना ही बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. (kangana ranaut highest paid actress in bollywood)

कंगना राणावतने आपल्या पुढील चित्रपटासाठी ३२ कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. एका चित्रपटासाठी ३२ कोटी रुपये घेतल्यामुळे कंगना राणावत बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. याआधी करीना कपूरला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण तिने १२ कोटी रुपये सांगितल्यामुळे तिला निर्मात्यांनी नकार दिला होता.

करीनाने १२ कोटींची मोठी रक्कम मागितली होती, त्यामुळे चित्रपटाचे बजेट वाढत होते. या कारणामुळे तिला निर्मात्यांनी नकार दिला. त्यानंतर बहुतेक लोकांनी सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाचे नाव सुचवले. त्यानंतर करीनाची वाढलेली मागणी आणि लोकांच्या कमेंट पाहून निर्मात्यांनी कंगनाला ही भूमिका ऑफर केली.

अभिनेता कमाल आर खानने हा दावा केला आहे. केआरकेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ‘सीता’ चित्रपटासाठी कंगना राणावतला ३२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. जे आतापर्यंत इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्रीला मिळालेले नाही.

याआधी करीना कपूरने सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटींची मागणी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यावर बराच गदारोळ झाला. नंतर चित्रपटाचे लेखक मनोज मुतानशिर यांनी दावा केला की, या भूमिकेसाठी कंगना राणावत हीच त्यांची पहिली पसंती होती.

मुनताशीरने सांगितले होते की, या भूमिकेसाठी कंगना त्याची पहिली पसंती होती. आम्ही या भूमिकेसाठी इतर कोणत्याही अभिनेत्रीला कधीही संपर्क साधला नाही. कंगनाने ही भूमिका करावी, असे आम्हाला नेहमीच वाटत होते. या कथेतील सीतेचे त्यांनी रेखाटलेल्या पात्राचे वेगवेगळे रंग आहे आणि त्या दृष्टीने कंगना ही खुप चांगल्या पद्धतीने ही भूमिका पार पाडू शकते.

महत्वाच्या बातम्या-
8 हजार पगार असलेल्या सेल्समनने कशी उभी केली साडेतीन कोटींची मालमत्ता? अधिकारीही हैराण
गाणे कसेही गायले तरी कौतुक कराच! इंडियन आयडाॅलच्या आयोजकांनी दिली होती ताकीद
PHOTO: ‘नमस्ते मेरा नाम है मोनिका’, झुंडमधील रिंकूचा लूक पाहून चाहत्यांच्या मनाचा सुटला ताबा

बाॅलीवुड राज्य

Join WhatsApp

Join Now