राष्ट्राध्यक्षांना सांगा मला ऑफिसमध्ये मॅडम नाही, सर म्हणतात; कंगनाच्या ‘इमर्जंसी’चा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा धाकड हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. असे असताना आता तिने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. जयललिता, झाशीची राणी यांची भूमिका साकारल्यानंतर आता कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. देशातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून त्यांची ओळख होती. (kanagana ranaut emergency teaser release)

कंगनाच्या या सिनेमाचं नाव इमर्जंसी आहे. या चित्रपटाचे शुटींग सुद्धा सुरु झाले आहे. तसेच कंगनाने या चित्रपटातील तिचा खास लूक शेअर केला आहे. चित्रपटाचा एक टीझर व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे ज्यात कंगना राणावत इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसून येत आहे.

टीझरमध्ये कंगना राणावत इंदिरा गांधीच्या अवतारात दिसून येते. ती एका कर्मचाऱ्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ऑफिसमध्ये आपल्याला मॅडम नव्हे तर ‘सर’ म्हणतात असा संदेश देण्यास सांगते. कंगनाने इंदिरा गांधींच्या लूकपासून आवाजापर्यंत अनेक गोष्टी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कंगना राणावतने इंदिरा गांधींची भूमिका चोखपणे साकारली आहे हे मान्य करावेच लागेल. कंगना राणावत इंदिरा गांधींसारखी दिसण्यासाठी तिचा मेकअपही खुप चांगलाच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये कंगना हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते. कंगनाच्या लूकवर अतिशय बारकाईने काम करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते.

कंगना राणावतच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे. इंदिरा गांधींच्या लूकमध्ये कंगना चाहत्यांना खूप आवडली आहे. चाहते म्हणत आहे की, बॉलीवूडची क्वीन या चित्रपटात धमाल करणार आहे. या चित्रपटाद्वारे कंगना पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार आहे, असा विश्वास एका यूजर्सने व्यक्त केला आहे.

अनेकजण टीझर पाहून कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणत आहेत. तसेच टीझर आणि फर्स्ट लूक खूप छान आहे. पुढच्या वर्षी जून महिन्यात हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा होती, पण आता कंगनाचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-
आलिया भट्टने ‘इतक्या’ कमी वयात केला होता आपला पहिला किस, वाचून बसेल आश्चरार्याचा धक्का
रस्ता पार करत असताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाण्याने ओढलं आत अन्…; पहा भयानक व्हिडिओ
लंडनच्या रस्त्यावर पाठकबाईंनी पकडली राणादाची कॉलर, व्हायरल व्हिडिओची चर्चा