Share

‘गुजरात दंगल आणि गोध्रा हत्याकांडावर चित्रपट निर्मिती केली असती तर कुत्रंही ते पाहायला गेलं नसतं’

सध्या सर्वत्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच ११ मार्चला शुक्रवारी ३.५५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

तसेच केवळ प्रेक्षकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा चित्रपट आवडला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये वादासाठी प्रसिद्ध असलेल्या कमाल राशिद खाननं विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाइल्सचं या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विधान केले आहे.

एकीकडे द काश्मीर फाईल्सवर कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे अशाप्रकारचे वक्तव्य करुन कमाल खाननं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये तो म्हणतो, द काश्मीर फाईल्सनं दुसऱ्या दिवशी साडेसात कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र अशाचप्रकारे गुजरात दंगलीच्या विषयावर चित्रपट तयार केला असता तर कुत्रंही तो चित्रपट पाहायला गेलं नसतं.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1502835902950825993?s=20&t=ArbznirRlcRmqGLeDXwYmQ

सध्या सोशल मीडियावर कमाल खाननं ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये तो म्हणतोय, “द काश्मीर फाइल्स चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.५ कोटी कमावले आणि तो सुपरहिट ठरला. पण गुजरात दंगलीवर चित्रपट काढला तर कुत्रंही पाहायला जाणार नाही. हे आजच्या भारताचं सत्य आहे आणि मोदीजी २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान होतील हा याचा पुरावा आहे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही”, असे केआरके म्हणाला.

दरम्यान, तर वाचा कोण आहे कमाल राशिद खान.. कमाल राशिद खान हा अभिनेता, ज्याला नेहमी केआरके किंवा कमाल आर खान म्हणून संबोधले जाते, तो एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. २००९ मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन त्याने आपली छाप पाडली.

महत्त्वाच्या बातम्या
किसींग सीन आणि शर्टलेस होताच प्रभासला फुटतो घाम; म्हणाला, “ते सीन करताना…”
जेठालालला सुटाबुटात पाहून बबिता झाली फिदा, जवळ गेली अन्…;पहा व्हायरल व्हिडिओ
PHOTO: वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, टू-पिस घालून केला कहर
रोहित शर्माचं नेमकं चाललंय तरी काय? चाहत्याचं नाक फोडलं तर खेळाडूचा गुडघा फोडला

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now