असे म्हणतात प्रेम आंधळे असते, त्याला नात्याचं, वयाचं, रंगाचं कुठलंही बंधन नसतं. पण अशा प्रेमातून काही वेळा धक्कादायक घटनाही सामोरे येत असतात. आता अशीच एक घटना औरंगाबाद येथून समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दीर भावजयीने विष प्राशन करून जीव दिला आहे. (kakasaheb satyabhama suicide)
जिल्ह्यातील जालना रोडवर एक प्रेमी जोडपे शुक्रवारी संध्याकाळी मिठी मारून चालताना दिसत होते. त्यांनी विष प्राशन केलेले होते. चक्कर येत असल्यामुळे दोघांनी घट्ट मिठी मारलेली होती. पण त्यानंतर ते काही वेळात खाली कोसळले आणि तडफडून लागले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
करमाडच्या कृषिबाजार समितीसमोर घडलेल्या या घटनेची माहिती तिथल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. तसेच त्यांचे मोबाईलही पोलिसांना दिले. पोलीस तपासात असे समोर आले की हे दीर भावजयी होते. आठ दिवसांपूर्वीच महिला सत्यभामा कदम आपल्या बहिणीसोबत गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
सत्यभामा गोलटगाव येथील आपल्या बहिणीकडे वाढदिवसासाठी आली होती. तेव्हापासून दोघी बहिणी गायब होत्या. त्यानंतर बहीण मिळाली पण सत्यभामाचा शोध पोलीस घेत होते. त्यानंतर सत्यभामा यांचे त्यांचे दीर काकासाहेब यांच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.
काकासाहेब कदम हे शेती करत होते. तसेच ते मालवाहू ट्रक चालवून आपलइ कुटुंब चालवत होते. त्यांचा आई, वडील, मुलगा मुलगी असा परिवार आहे. तर सत्यभामा या गृहिणी होत्या. त्यांच्या मागे, पती, सासू, सासरे दोन मुले असा परिवार होता. पण दोघांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे प्रेमी युगुल एकमेकांना मिठीत घेऊन करमाडा येथील रोडवर चालत होते. त्यावेळी दोघांनीही विष प्राशन केलेलं होते. त्यामुळे त्यांना उलट्याही होत होत्या. त्यानंतर ते अचानक खाली कोसळले आणि तडफडू लागले. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपास केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
महत्वाच्या बातम्या-
वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव; वाचा नक्की काय घडलं?
राहूल बजाज आमच्यासाठी देव होते, त्यांनी लाखो कुटुंबे उभी केली म्हणत कामगार ढसाढसा रडले
IPL लिलावात हैद्राबाद संघाकडून कोट्यावधींची बोली लावणारी ती ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे?