हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यातील वाद वाढत चालला आहे. अंबर हर्डने अलीकडेच जॉनी डेपवर गैरवर्तन आणि चुकीची वागणूक दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जॉनी डेपने माजी पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्याचा खटला नुकताच न्यायालयात सुरू झाला आहे. (johny depp wife shocking allegation)
सुनावणीदरम्यान अंबर हर्डच्या वकिलाने जॉनी डेपवर अनेक गंभीर आरोप केले. जॉनी डेप आणि त्याची पत्नी अंबर हर्ड यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता. घटस्फोटाच्या वेळी त्यांची एवढी भांडण नाही झाले तेवढी आता होत आहे. पीपल मॅगझिननुसार, अंबर हर्डने घटस्फोटानंतर जॉनी डेपवर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता.
अंबरने २०१८ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराबद्दल तिचा अनुभव शेअर केला होता. तसेच तिला जॉनी डेपसोबत राहताना कशाचा सामना करावा लागला ते सांगितले होते. तिने यात कुठेही जॉनी डेपचे नाव घेतले नव्हते. तरी जॉनीने माजी पत्नी अंबर हर्डच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला.
अशात व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी कोर्टहाऊसमध्ये सुरू असलेल्या खटल्यादरम्यान अंबर हर्डच्या वकिलांनी जॉनी डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. अंबर हर्डच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, पुराव्यावरून असे दिसून येते की डेपने अंबर हर्डचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक शोषण केले आहे.
अंबर हर्डने जॉनी डेपवर लैंगिक अत्याचाराचा आरोपही केला होता. वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, अंबर हर्डसोबत काही अतिशय भीतीदायक गोष्टी घडल्या आहेत. डेपने अंबर हर्डचा नाईट गाऊन फाडला आणि नंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटली घातली. जॉनी डेपने दारूच्या नशेत अंबरचे शोषण केल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. तो त्यावेळी पूर्ण ‘राक्षस’ झाला होता.
दरम्यान, जॉनी डेपने म्हटले होते की, अंबर हर्डने कौटुंबिक हिंसाचारावर जो लेख लिहिला होता, तो तिने आपली प्रतिमा खराब करण्यासाठी लिहिला होता. तर अंबर हर्डने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच वेळी, एका जुन्या मुलाखतीत, अंबर हर्डने कबूल केले होते की. ती देखील जॉनी डेपला मारत होती. त्यानंतर जॉनी डेपचे काही दुखावलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
महत्वाच्या बातम्या-
आता दिल्ली दंगलीची क्रुरता दाखवणार विवेक अग्निहोत्री? काश्मिर फाईल्सनंतर केली मोठी घोषणा
‘…तर तुम्हाला सोडणार नाही’; मुस्लीम संघटनेची थेट राज ठाकरेंना धमकी, उडाली खळबळ
अंडरवर्ल्ड डॉन अली बुदेशचा मृत्यु, एकेकाळी त्याने दाऊद इब्राहिमला मारण्याची घेतली होती शपथ