जॉनी डेप आणि अंबर हर्डचा मानहानीचा बहुचर्चित खटला नुकताच संपला. फेअरफॅक्स, व्हर्जिनिया येथे सहा आठवड्यांसाठी हा खटला चालला होता आणि डेपने तो जिंकला. आता अंबर हर्डला जॉनीला तब्बल ११६ कोटी द्यायचे आहेत. हा खटला संपल्यानंतर जॉनी डेपला यूकेमधील प्रसिद्ध गिटारीस्ट जेफ बेकसोबत अनेकवेळा पाहण्यात आले.
या दोघांनी बर्मिंगहॅममधील करी हाऊसमध्ये जेवण केले आणि तेथील सर्विस पाहून त्यांना आनंद झाला. याच आनंदाच्या भरात त्यांनी लाखो रुपयांची टीप दिली. बर्मिंगहॅममधील करी हाऊसमध्ये या दोघांनी हजारो डॉलर्स उधळले आणि नंतर वेटर्सलाही लाखो रुपयांची टिप दिली.
एम्बर हर्ड विरुद्ध खटला जिंकल्यानंतर डेप यूकेच्या आसपास अनेक ठिकाणी दिसला आहे. जॉनी डेप आणि जेफ बेक या जोडीने बर्मिंगहॅममध्ये करीचा आस्वाद घेतला आणि डेली मेलच्या म्हणण्यानुसार £50,000 (जवळपास 49 लाख रुपये) एवढी मोठी टीप वेटर्सला दिली.
अहवालानुसार, त्यांनी इंडियन फुड, कॉकटेल आणि रोज शॅम्पेनचा आनंद लुटला. बर्मिंगहॅममधील वाराणसी रेस्टॉरंटच्या प्रवक्त्याने नंतर माध्यमांना सांगितले की, जॉनी डेप आणि जेफ बेक यांना रात्रीच्या जेवणासाठी मी होस्ट करत होतो. त्यांना होस्ट करताना मला खुप आनंद झाला.
रेस्टॉरंटने एका वृत्तवाहिनीला याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांच्या टीमसाठी हा आयुष्यातील सगळ्यात सुंदर अनुभव होता. वाराणसी येथील ऑपरेशन डायरेक्टर मो हुसैन म्हणाले की, जॉनी डेप आणि त्यांच्या टिमला आम्ही दिलेले जेवण खुप आवडले. त्यांना जेवण इतके आवडले की त्यांनी पुन्हा हॉटेल रुममध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आमचं कौतुकही केलं.
हुसैन म्हणाले की डेपने कर्मचारी सदस्य त्यांचे मित्र आणि रेस्टॉरंट मालकाच्या कुटुंबीयांसह वेटर्सलाही मिठी मारली आणि त्यांना किस केलं. त्यानंतर डेप सर्वांशी बोलण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी थांबला. पुढे हुसैन म्हणाले की, ते माझ्या तीन मुलींना भेटले आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटातील काही वन-लाईनर त्यांना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, विधानपरिषदेसाठी संधी दिलेले पाडवी आहेत तरी कोण? जाणून घ्या..
दृष्टी गेली तरी मानली नाही हार, UPSC मध्ये पटकावला ७ वा क्रमांक, आईने आणि मित्राने लिहीला पेपर
मुसेवालाची हत्या करणारे शुटर आंबेगाव, जुन्नरचे; मुसेवाला प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर
सलमानचा खात्मा करण्यासाठी आणली होती ४ लाखांची रायफल, ‘असा’ आखला होता प्लॅन, वाचून हादराल