Share

एलॉन मस्कने जॉनी डेपची पत्नी एम्बर हर्डसोबत केलं होतं थ्रीसम? नवीन खुलाश्याने कोर्टही हादरलं

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. यापूर्वी, माजी पत्नी अंबर हर्डने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते आणि आता जॉनीने अॅम्बर हर्डच्या विरोधात मानहानीचा अर्ज दाखल केला आहे. अभिनेत्याने आपल्या माजी पत्नीवर असे अनेक आरोप केले आहेत, ज्यामुळे लोक हैराण झाले आहेत.

जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांनी आपापल्या अर्जात एकमेकांबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. जॉनी डेप 2017 मध्ये एम्बरपासून वेगळा झाला होता. दोघांचा घटस्फोट झाला, पण तरीही त्यांच्यातील तणाव कमी झालेला नाही. दोघांमधील प्रकरण शांत होण्याऐवजी वाढतच आहे.

जॉनी आणि अंबर एकमेकांवर नवीन आरोप करत आहेत. त्यांच्या नात्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ज्यामध्ये शारीरिक छळ ते फसवणूक अशा गंभीर आरोपांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅम्बर हर्डने दावा केला आहे की जॉनी डेप तिचा शाब्दिक आणि शारीरिक छळ करत असे. अंबरच्या म्हणण्यानुसार, जॉनीने तिचे लैंगिक शोषणही केले होते.

एवढेच नाही तर त्याने अंबरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटली घुसवली होती. तिच्या म्हणण्यानुसार घटना 2015 ची आहे, जेव्हा ती जॉनीसोबत ऑस्ट्रेलियात सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्याचवेळी जॉनी डेपने अंबरवर शारीरिक छळ केल्याचा आरोपही केला आहे. जॉनीच्या म्हणण्यानुसार, अंबरने त्याच्यावर वोडकाची बाटली फेकली आणि त्याचे हाताचे बोट कापले गेले होते.

त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अभिनेत्याच्या मते, पायरेट्स ऑफ द कॅरिबियनच्या पाचव्या सीझनमध्ये निर्मात्यांनी सीजीआयच्या मदतीने बोट दाखवले होते. घटस्फोटानंतर अॅम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप तिला दारू पिऊन मारहाण करायचा. जॉनीने अंबरचे आरोप स्पष्टपणे नाकारले. यानंतर, 2018 मध्ये, एम्बर हर्डने जॉनीविरूद्ध एक खुले पत्र जारी केले होते ज्यामध्ये तिने अभिनेत्यावर मारहाणीचा आरोप केला.

मात्र, त्यात तिने जॉनी डेपचे नाव लिहिलेले नव्हते. पण, हे पत्र समोर आल्यानंतर जॉनी डेपने माजी पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. अंबरच्या वकिलाने डेप आणि त्याचा मित्र बारूच यांचे चॅट्स उघड केले, ज्यामध्ये जॉनी त्याच्या पत्नीविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरताना दिसतो. वृत्तानुसार, बारूचने हे देखील कबूल केले होते की अभिनेत्याने हे शब्द आपल्या माजी पत्नीसाठी वापरले होते. जॉनी डेपने अंबर हर्डवर फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.

डेपच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण 2016 चा आहे. जेव्हा त्याची पत्नी त्याच्याच अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या कोणाशी तरी होती. एलन मस्कचे नाव या प्रकरणात पुन्हा एकदा ओढले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये एलॉन मस्क एम्बरच्या प्रेमात पडला होता. नंतर एम्बरनेही एक फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली होती.

दोघेही एकमेकांना भेटायचे. आता सुनावणीदरम्यान जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एलॉनचे अंबर हर्ड आणि मॉडेल cara delevigne यांच्यासोबत थ्रीसम झाले होते. त्यांनी २०१६ मध्ये जॉनी डेप आणि हर्डच्या लॉस ऍजेलिसमधील अपार्टमेंटमध्ये थ्रीसम केले होते. हे सगळं घडलं तेव्हा जॉनी शुटींगसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता.

महत्वाच्या बातम्या
‘या’ अभिनेत्रीने कॅन्सरवर केली मात, सहा तास चालली शस्त्रक्रिया; म्हणाली, ‘प्रार्थना करणं बंद करू नका’
चालू लोकलमधून तीन तरुणींनी लागोपाठ मारल्या उड्या अन्…; मुंबईतील भयानक व्हिडिओ आला समोर
भर पार्टीत ‘या’ व्यक्तीने खेचली मलायका अरोराच्या बॅकलेस ड्रेसची दोरी, फोटो झाले व्हायरल
आझम फक्त माझा आहे म्हणत तरुणीने घेतली छतावरुन उडी, आता कंबर मोडल्यानेमुळे चालणे झाले अशक्य

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now