बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सध्या तो ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत अर्जुन कपूर (Arjun Kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पटानी (Disha Patani) दिसणार आहेत. त्याचबरोबर आता जॉन अब्राहमनेही त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.
जॉन तेहरान या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून आता या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. जॉन अब्राहमच्या पुढील चित्रपटाची घोषणा करताना, मॅडॉक फिल्म्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्याचा लूक पाहायला मिळतो.
काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जॉन अतिशय दमदार एक्सप्रेशनमध्ये दिसत आहे आणि त्याचा लूकही कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. जॉनचा फर्स्ट लूक शेअर करताना मॅडॉक फिल्म्सने ट्विटरवर लिहिले की, “लाइट्स, कॅमेरे आणि थोड्या अॅक्शनसह, तेहरानमध्ये शूटिंग सुरू होत आहे.” जॉनने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.
सत्य घटनांवर आधारित जॉनचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट तेहरान, अरुण गोपालन दिग्दर्शित करत असून त्याचे चित्रीकरण इराणमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे लेखन रितेश शाह आणि आशिष प्रकाश वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. एकदा जॉनने त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, तो इराणमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप उत्सुक आहे आणि हा एक उत्तम चित्रपट असेल.
जॉन अब्राहमच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेता शेवटचा ‘अटॅक’ चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, चित्रपट ओटीटीवर आला आहे. जॉन आता ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे, जो २९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय जॉन अब्राहम शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि जॉनसोबत दीपिका पदुकोण देखील आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. म्हणजेच जॉनचा चित्रपट ‘तेहरान’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
जॉन अब्राहम साऊथ इंडस्ट्रीवर भडकला, म्हणाला, मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे आणि..
जॉन अब्राहमला मिळाली होती तालिबानकडून धमकी, १६ वर्षांनंतर सांगितला भीतीदायक किस्सा
Attack Trailer 2: जॉन अब्राहम बनला सुपर सोल्जर; अडीच मिनिटात केला नुसता धुराळा
जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती