आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये जास्तीत जास्त बोली आपली बोली लावली जावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. पण एखादा खेळाडू एका हंगामात आयपीएल खेळण्यास नकार देतो आणि तरीही संघ त्याला विकत घेतो, असे क्वचितच घडते. असेच काहीसे आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने असा खतरनाक गोलंदाज विकत घेतला आहे, जो आयपीएल २०२२ मध्ये भाग घेणार नाही. (jofra archer sold 8 crore)
मुंबई इंडियन्सने आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चरला विकत घेतले आहे. इंग्लंडच्या प्राणघातक गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरला मुंबई संघाने ८ कोटी रुपयांमध्ये जोडले आहे. जोफ्रा आर्चरने आधीच सांगितले होते की तो आयपीएल २०२२ हंगामात खेळणार नाही.
अशात मुंबईने लांब पल्ल्याचा विचार करून आर्चरवर मोठा डाव खेळला आहे. मुंबई इंडियन्सच्या या खरेदीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण आर्चर हा आपल्या एकट्याच्या दमावर पुर्ण सामना पटली करण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही फलंदाजीचा आऊट करु शकतो.
आता इंग्लंडचा स्टार खेळाडू जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा नवा जोडीदार बनणार आहे. आर्चरच्या बॉलिंगवर खेळणे कुणालाही सोपे नाही. जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये ३५ सामन्यात ४६ विकेट घेतल्या आहेत.
आर्चरचा इकोनॉमी रेट ७ च्या आसपास आहे. जोफ्रा आर्चरचा एकूण टी २० रेकॉर्ड पाहता त्याने ११८ डावात १५३ विकेट घेतल्या आहेत. तर १८ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आता त्यांची नजर सहाव्या विजेतेपदावर असेल.
जोफ्रा आर्चर हा अतिशय धोकादायक गोलंदाज आहे. इंग्लंडने विश्वचषक २०१९ चे विजेतेपद पटकावले. हा विश्वचषक मिळवण्यात आर्चरचा मोठा वाटा होता. जोफ्रा आर्चर इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ट्विटरवर म्हटले आहे की, खेळाडूला दुखापत झालेली आहे हे माहित असते, पण तरीही तुम्हाला दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले जाते, मग तुम्ही चांगले आहात.
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला IPL ऑक्शनमध्येही नाही मिळाला भाव, बेस प्राईजवरच विकला गेला
उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं नाही तर…; अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, एकदिवस हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान बनेल