राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे बाली येथील सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या कोविड आरोग्य सहाय्यकाची रस्त्यावर सुरा भोसकून हत्या करण्यात आली आहे. बरवा गावात राहणाऱ्या जितेंद्र पाल मेघवाल याची मंगळवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हत्या केली. (jitendrapal murder because of his personality)
मंगळवारी झालेल्या खून प्रकरणात पाली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्रच्या दोन्ही मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बाली एएसपी ब्रिजेश सोनी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
त्या दोन्ही आरोपींना पाली जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आले आहे. त्या दोन्ही तरुणांनी जितेंद्रवर चाकूने सात हल्ले केले होते. या घटनेनंतर मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी बाली रुग्णालयाबाहेर धरणे धरून बसले होते. मृतदेह स्वीकारण्यास नकार देत मृताचे नातेवाईक बळी-सदरी रस्त्यावर शासकीय रुग्णालयासमोर तंबू ठोकून बसले होते.
आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी एसपी राजन दुष्यंत यांनी आठ पोलिस पथके तयार केली होती जे आरोपींचा शोध घेत होते. याशिवाय पोलिसांनी दोन पथके गुजरातलाही पाठवली होती.
या घटनेची सुरुवात २३ जून २०२० रोजी झाली जेव्हा जितेंद्र मेघवाल बरवा गावात त्यांच्या घराबाहेर बसला होता. त्यावेळी तिथून जात असलेल्या गावातील सूरजसिंग राजपुरोहित याच्याशी त्याचा वाद झाला. त्यावेळी त्यांनी जितेंद्रला घरी येऊन मारहाण केली होती. त्यानंतर जितेंद्रने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे तो सूरतला निघून गेला.
जितेंद्रला नोकरी लागल्यामुळे त्याची लाईफ स्टाईल खुप बदलली होती. तसेच आरोपी हा जितेंद्रचा हँडसम लूक आणि रॉयल पर्सनॅलिटी पाहून जळत होता. त्याचदरम्यान जितेंद्रने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ते पाहून आरोपीचा आणळी जळफळाट झाला.
त्यानंतर सूरज सिंग दुचाकीवर ८०० किमी प्रवास करुन सूरतहून जितेंद्रच्या कामाच्या ठिकाणी आला. त्याने जितेंद्रच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जितेंद्र तिथून जात असताना त्याच्यावर सूरजने आणि त्याच्या मित्राने चाकूने हल्ला केला आणि जितेंद्रची हत्या केली.
आता पोलिसांनी सूरज सिंग आणि रमेश सिंग अशा दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणामुळे संपुर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. तसेच मृत्यु झालेल्या तरुणाच्या कुटुंबाने सरकारकडे ५० लाखांची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
विश्वकप खेळायचा असेल तर IPL मध्ये करावी लागेल दमदार खेळी; भारताच्या स्टार प्लेयरची कारकिर्द धोक्यात
अभिनय आणि आईची जबाबदारी सांभाळता येईना, अनु्ष्का शर्माने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..
बापाने मुलासोबत मिळून केली जावई आणि त्याच्या भावाची हत्या, १० वर्षांपासून बघत होता या क्षणाची वाट