रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या आहेत. नोटिसा हाती पडताच नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. यानंतर स्थानिकांसह खासदार आणि आमदारही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनीही यावरुन इशारा दिला आहे. (jitendra awhad warns railway administration on central railway notice)
ते शनिवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. ‘तुमची घरे राष्ट्रवादी कॉंग्रेस वाचविणार, एका घरालाही धक्का देऊ देणार नाही. वेळ आली तर काय करायचे ते आपल्याला माहितीच आहे. तुमच्या घरांच्या बाजूलाच रेल्वे लाइन आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तीन तास बंद झाली तर समजा अख्ख्या भारत बंद होतो, असे आव्हाड म्हणाले.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1484841543794139136?s=20
तसेच ‘कल्याण पूर्व मधील आनंदवाडी परिसरात रेल्वेच्या जागेत असलेल्या घरांना देखील नोटिसा धाडल्या असून 50 वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतक्या वर्ष रेल्वे झोपली होती का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याआधी लोकांची पर्यायी व्यवस्था आधी करा मगच घरं खाली करा, अन्यथा आम्ही त्या लोकांसोबत उभे राहू, असा इशारा दिला होता. “कळव्यात जेव्हा असाच निर्णय झाला होता तेव्हा आम्ही तीन तास रेल्वे रोखून धरतसरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडलं होतं. मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा लोकांचा कार्यकर्ता आहे. आम्ही एकाही माणसाला घराबाहेर प़डू देणार नाही. निवारा त्यांचा हक्क असून कोणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन. गरिबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,’ असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरातील रहिवाशांची भेट घेतली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी या रहिवाशांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले. आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नवनीत राणांची जीभ घसरली! ‘मला विचारुन लफडे केले का तुम्ही?’, ऑडिओ क्लीप व्हायरल
मोदींना कोण देऊ शकतं टक्कर? पुढचा पंतप्रधान कोण होणार? जनतेने घेतलं ‘या’ नेत्याचं नाव
“नागपूरात महिलांचा नग्न डान्स, ठाकरे सरकारने सर्व लाजशरम वेशीवर टांगलीय का?”
राजनाथ सिंहांच्या मुलाला तिकीट पण मनोहर पर्रीकरांच्या मुलाला का नाही? काय आहे भाजपचा गेमप्लॅन?






