Share

‘आमदारांना देण्यात येणारी घरे मोफत देणार नाही तर..,’ गदारोळ झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

jitendra awhad

गुरुवारी विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठी घोषणा केली. मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरूपी घरे देण्यात येतील, अशी घोषणा आव्हाड यांनी केली. मात्र आव्हाड यांच्या या निर्णयावर विरोधकांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली.

भाजप, मनसेसह अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आमदारांच्या घरावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घरांच्या निर्णयावरून सरकारला खडा सवाल केला आहे. पाटील यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

‘आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. चार कोटीचा आमदार निधी दिला. तो आधी मुळात दोन कोटी होता. कोविड असतानाही चार कोटी केला. आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे पगार वाढवले. सहाय्यकचे पगार वाढवले. घरे देणार. कशासाठी पाहिजे घरं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान गदारोळ होऊ लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.आमदारांमध्येच घरे घेण्यावरून दुमत असल्याने अखेर राज्य सरकारने घरांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदारांना देण्यात येणारी घरे मोफत देण्यात येणार नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1507237611806806025?s=20&t=R_Ataw-pQLgBz-TdQZgGcg

ट्विट करत याबाबत आव्हाड म्हणतात, “आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,” असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिलं आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे देणार असल्याचं विधानसभेत जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ज्याला भुताटकी म्हणायचे, तोच बंगला विकत घेऊन राजेश खन्नाचे चमकले नशीब; दिले अनेक हिट चित्रपट
रिलीजपुर्वीच नोट छापणारी मशीन बनला राजामौली यांचा RRR चित्रपट; तब्बल इतक्या कोटींची केली कमाई
जळगावातील ह्रदयद्रावक घटना! लग्न होईना म्हणून तरुणाने घेतला गळफास, परिसरात हळहळ
नारायण राणे यांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्ही कधीही कॉल करा पण…’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now