Share

बंडातात्या किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न; सुप्रियाताईंना दारूडी म्हटल्यामुळे राष्ट्रवादी संतापली

ncp

सर्वच मोठ्या पुढाऱ्यांची मुले दारू पितात. राजकारणात येण्याअगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील,’ वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांच्या या विधानामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बंडातात्या कराडकर यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. पंकजा ताई असो किंवा सुप्रियाताई असो..एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नसल्याचे आव्हाड यांनी म्हंटले आहे.

तसेच एका किर्तनकाराच्या तोंडी अशी भाषा येणं म्हणजे तो किर्तनकार आहे की नाही हा प्रश्न उभा राहतो. बंडातात्या कराडकर, यांची मुळं कुठे आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले. यात मनावर घेण्यासारखं काही नाही, असे म्हणत आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.

याचबरोबर ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत”, असं देखील आव्हाड म्हणाले. दरम्यान, राज्य शासनाच्या वाईन विक्री धोरणाविरोधात व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे गुरुवारी साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले.

यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला. कराडकर यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यावेळी पुढे बोलताना तात्या म्हणाले, सर्वच मोठ्या पुढाऱ्यांची मुले दारू पितात.

तसेच राजकारणात येण्याअगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील. कराडकर यांच्या या विधानामुळे आता राजकारण चांगलेच तापणार आहे. मात्र अद्याप पंकजा मुंढे आणि सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

ते म्हणाले, ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगले माणूस आहेत. दारु आणावी, मंदिरं बंद करावीत सप्ते बंद करावेत, वाऱ्या बंद कराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे पुढारी नाहीत. पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. हा ढवळ्या म्हणजे अजित पवार. अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले.”

दरम्यान, दारूविक्री माता-भगिनी आणि महिलांचे संसार धुळीला मिळाले आहेत तर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर गावागावातील वारकरी ते दुकान जाळल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या
अजित पवारांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा हट्ट; वाचा नेमकं काय घडलं…
“उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते”
झोपडपट्टी धारकांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, फक्त अडीच लाखात मिळणार घर
आमिर खान किरण राव पुन्हा येणार एकत्र? दोघांचा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now