गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. (jitendra avhad criticize raj thackeray)
आपला देश जातीपातींमध्ये विभागला गेला आहे. महाराष्ट्रातही हीच गत आहे. महाराष्ट्र हा जातीपातींमध्ये विभागावा, ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. लोक जातीपातींमध्ये विभागले जावे, शरद पवारांची हिच इच्छा आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आता राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांनी मनसेचा झेंडा दाखवला आहे. तसेच तुमचे जातीपातीचे राजकारण कधी संपणार राज ठाकरे? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन मिळत नाही. हे गणित ठेवूनच लोक भाषण करतात. मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतीशील विचारांचा वाटायचा, की माझ्याकडे विकासाची ब्लुप्रिंट आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. महराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात ही प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. दंगल कशाला म्हणतात, हे राज ठाकरेंना माहित नाही. राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची ४ ते ५ पुस्तके वाचायला हवी होती. त्यांना जात-पात काय आहे हे समजलं असतं? त्यांना जात-पातचे जन्मदाते कोण आहे? हेही समजलं असतं, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक असे नेते आहे, जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणारा वक्ता असला की जातात, भाषणाचा हा इतिहास आहे, असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात आणि मग एखादं लेक्चर देतात; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या मीना कुमारी खऱ्या आयुष्यात ‘या’ गोष्टीमुळे होत्या खुपच दु:खी; औषधांऐवजी प्यायच्या दारु
”चीनला आम्ही बघून घेऊ, रशियाच्या तेलावर अवलंबून असलेल्या पाश्चात्य देशांनी आम्हाला भाषण देऊ नये”