Share

हा कुंभकर्ण २० वर्षांपासून झोपला होता का? जेम्स लेनच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले

जेम्स लेन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर मनसेने पुरंदरेंचे जेम्स लेनच्या पुस्तकाला विरोध असल्याचे पुरावे दिले होते. तसेच शरद पवारांनी यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी मनसेने केली होती. (jitendra avhad angry on james laine)

अशात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिहिणाऱ्या पुस्तकाचे लेखक जेम्स लेननं एक मुलाखत दिली असून त्यांनी हैराण करणारी प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पुरंदरेंशी आपली कुठलीही चर्चा झाली नसल्याचे जेम्स लेनने सांगितले आहे.

त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केलेला नाही. तसेच पुस्तकासाठी मला कोणीही माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’मध्ये कुठलाही ऐतिहासिक दावा केलेला नाही. मी फक्त कथा सांगितली आहे. त्याला ऐतिहासिक तथ्य नाही. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी एक शब्दानेही चर्चा झाली नाही, असे जेम्स लेनने म्हटले आहे.

जेम्स लेनच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. हा वाद २००३ मध्ये सुरु झाला, तेव्हापासून हा कुंभकर्ण झोपला होता का? एवढेच जर शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होते तर मजकूर वगळला का नाही? असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

तसेच जेम्स लेनला कोण मॅनेज करतंय हे माहिती नाही.पण जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? हा किती मोठा कट आहे. महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण केल्याचं काम केलं जातंय. आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का? महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका परीणाम गंभीर होतील, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

दरम्यान, शरद पवारांनी याप्रकरणी एक वक्तव्य केले होते. जेम्स लेननं त्याच्या पुस्तकात जे लिखाण केलं होतं, ते त्याने पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे केल्याचं म्हटलं होतं अतिशय घाणेरडं लिखाण एखाद्या लेखकाने केले आणि त्याला माहिती पुरवण्याचे काम पुरेंदरेंनी केलं होतं. त्यावर पुरंदरेंनी कधीही स्पष्टीकरण दिले नाही. त्या गोष्टीला माझा विरोध आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
‘Indian Idol Marathi’ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, ‘या’ दिवशी होणार विजेतेपदासाठी लढत, प्रेक्षक उत्सुक
शेतकऱ्याचा नादखुळा प्रयोग! गुरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी छतावर बसवलं ‘हे’ उपकरण, लोकांनी केलं कौतुक
आमच्याकडून मिरवणूक निघत असताना जर त्यावर दगडफेक होणार असेल तर.., राज ठाकरेंचा इशारा

राज्य ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now