Share

नितीशकुमारांनी भाजपचं टेन्शन वाढवणारी केली घोषणा; भाजपला लोकसभेला फक्त ५० जागा मिळणार

nitisha kumar
महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील राजकीय भूकंप झाला. बिहारमध्ये भाजपकडून दगाफटक्याचा चाहूल लागल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार सावध झाले. बिहारमध्ये भाजपासोबतची युती तुटल्यानंतर राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) घरोबा करणाऱ्या कुमारांचे लक्ष आता 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर असल्याच बोललं जातं आहे.

बिहारमध्ये भाजपासोबतची युती तुटल्यानंतर मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे आमदार सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र जेडीयू पक्षाच्याच ५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर एकीकडे जेडीयू इतर राज्यांमध्ये स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

याचबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोणता चेहरा द्यायचा असा प्रश्न विरोधकांसमोर आहे. सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू आहे. काल बिहारची राजधानी पाटणामध्ये नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.

यावेळी, नितीशकुमारांनी भाजपचं टेन्शन वाढवणारी घोषणा केली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिहं यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ १५० जागा मिळतील, असं म्हटलं. मात्र याच बैठकीत नितीशकुमार यांनी ललन सिहं यांच्या विधानात दुरुस्ती केली.

भाजपला लक्ष करताना नितीशकुमार यांनी म्हंटलं आहे की, भाजपला केवळ देशभरात ५० जागा मिळतील आपल्याला त्यांना रोखायचं आहे, असं म्हणत जदयूच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश नितीशकुमारांनी दिले. यावरून राजकारण तापलं आहे. नितीशकुमार यांच्या व्यक्तव्यानंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं.

भाजपचे प्रवक्ते अरविंद सिंह यांनी म्हंटलं आहे की, नितीशकुमारांनी भाजपवर बोलण्यापूर्वी आघाडी निर्माण करावी, असं म्हटलं आहे. याचबरोबर याच बैठकीत नितीशकुमार यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या षड्यंत्रामुळं जदयूच्या जागा घटल्याचा दावा करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ गटात जुंपली! आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना झाप – झाप झापले, वाचा काय म्हंटलंय?
आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा; रामदास कदमांनी केली पोलखोल
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार
थेट मुळावरच घाव! उद्धव ठाकरेंचा सर्वात जवळचा माणूस फुटणार? शिंदेंनी घरी जाऊन घेतली भेट
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now