jaykumar gore help pa and driver | भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात गोरेंसोबतच चार जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या जयकुमार गोरे यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत आता रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
रुबी रुग्णालयाचे डॉ. कपिल झिरपे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की जयकुमार गोरे यांच्या जीवाला कोणताही धोका नसून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गोरेंना मुकामार लागल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
मेडिकल पॅरामीटरनुसार सगळे बरोबर आहे. त्यामुळे चिंता करण्याची कोणती गोष्ट नाही. ते शुद्धीवर असून ते डॉक्टरांशी सुद्धा बोलत आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच त्यांना आता कोणालाही भेटता येणार नाहीये, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा रुबी रुग्णालयात गर्दी करु नये, असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी गोरेंच्या निकटवर्तीयांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काल आम्ही नागपूरवरुन पुण्यात आलो होतो. पुण्यावरुन त्यांच्या गावी जात असताना फलटणजवळ असताना गाडी पुलावरुन खाली कोसळली. यावेळी त्यांच्यासोबत चालक, दोन सुरक्षारक्षक आणि एक सचिव होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाची आणि सचिवाची प्रकृती चिंताजनक आहे.
तसेच गोरेंनी ज्या निकटवर्तीयाकडून मदत मागितली त्यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, जयकुमार गोरे यांचा मला ३ वाजून ५ मिनिटांनी फोन आला. त्यांनी सांगितलं की गाडीचा अपघात झाला आहे. लोकेशन सांगता येणं शक्य नाही. पण फलटणच्या आसपास आहे.
त्यानंतर मी तातडीने तिथे पोहचलो. घडनास्थळी पोहचलो तेव्हा गाडी ७० ते ८० फुट खाली पडल्याचे लक्षात आले. गोरेसाहेब ज्या बाजूने बसतात त्याच बाजूने गाडी आपटली होती. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच या अपघातात सचिव आणि चालक गंभीर जखमी झाला होता. हे गोरेंना माहिती होते. त्यामुळे गोरेंनी सचिव, चालक आणि अंगरक्षकांना आधीच्या रुग्णावाहिकेतून रुग्णालयात पाठवले. त्यानंतर शेवटच्या रुग्णवाहिकेतून ते रुग्णलायत गेले. या अपघातात त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. पण त्यांची प्रकृती आता ठिक आहे, असेही त्या निकटवर्तीयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला लोकांची बेदम मारहाण; म्हणाले, हिंदू वस्तीत हे चालणार नाही
rohit shetty : माझा चित्रपट १०० कोटींचा व्यवसाय करतो त्यामध्ये…; रोहित शेट्टीचे महाराष्ट्रावर हैराण करणारे वक्तव्य
shashikant dabhi : सांताक्लॉज बनून गिफ्ट वाटणाऱ्या तरूणाला लोकांनी केली बेदम मारहाण; धक्कादायक कारण आले समोर