Share

रणवीरचा जयेशभाई जोरदार फुस्स, तर धर्मवीरने गाजवलं बॉक्स ऑफिस, पहा कितीये कमाईचा आकडा?

असे म्हटले जात आहे की बॉलिवूडच्या चित्रपटांची ताकद आता कमी होत चालली आहे. कधी काळी तुफान कमाई करणारे बॉलिवूडचे सिनेमे सध्या फ्लॉप ठरताना दिसून येत आहे. हिरो कोणताही असो पण बॉलिवूला आता चांगला सिनेमा बनवणं कठिण झालेलं दिसतंय, त्यामुळे त्यांना कमाई सुद्धा करता येत नाही. (jayeshbhai jordar flop and dharmveer hit on box office)

बॉलिवूडला साऊथचे चित्रपट टक्कर देताना दिसून येत होते. असे असताना आता एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच्या सिनेमाला आता मराठी सिनेमा टक्कर देताना दिसून येत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फुस्स झाला आहे, तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपटा चांगलाच हिट ठरत आहे.

जयेशभाई जोरदारचे बजेट पाहता ते धर्मवीरपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. पण कमाईचा विचार केला तर धर्मवीर चित्रपटाने जयेशभाई जोरदारला कधीच मागे टाकले आहे. धर्मवीर हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला असून १३ मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २.५ कोटींची कमाई करत सर्वांनाच हैराण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३.१७ आणि तिसऱ्या दिवशी ३.८६ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे.

धर्मवीर चित्रपटाने फक्त तीनच दिवसांत ९.८ कोटींची तगडी कमाई केली आहे. या कमाईमुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रभरात ४०० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. असे असतानाही या चित्रपटाने १० कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

अशात जयेशभाई जोरदारला मात्र कमाईसाठी स्ट्रगल करावा लागतोय. बजेट जास्त असल्यामुळे त्याने धर्मवीरपेक्षा थोडी जास्त कमाई केली असली तरी ती बजेटच्या मानाने कमीच आहे. जयेशभाई जोरदारने ३ दिवसांत १२ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे बजेटचा विचार केला तर धर्मवीरने जयेशभाई जोरदारला कधीच मागे सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांवर टीका करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात; पुण्यातील बड्या नेत्याची हकालपट्टी
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलीस लाच घेताना अटकेत; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाठ्याकाठ्यांनी चोपलं, शाळकरी मुलींच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now