Share

थोडं थांबा उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील; जयंत पाटलांच्या विधानाने राजकारणात खळबळ

शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर पडले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत नवीन सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे. (jayant patil shocking statemnet on uddhav thackeray)

या नवीन सरकारवर आता विरोधी पक्षातील नेते टीका करताना दिसून येत आहे. असे असतानाच आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे विधान त्यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाबाबत पाच सदस्यांचे खंडपीठ नियुक्त करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यात व्हीप झुगारणारे आमदार अपात्र ठरतील, त्यामुळे राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केले आहे. त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये होणार आहे. तसेच खंडपीठाची नेमणूक हीच सर्वोच्च न्यायालयाची गंभीर कृती आहे. विधी मंडळात जे काम झाले ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

आता पाच न्यायमूर्तींची निवड झाल्यानंतर खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्यांचा उलगडा होणार आहे. त्याला काही काळ लागेल. त्यामुळे देर है पर अंधेर नहीं. असे जे म्हणतात ते यामध्ये घडले. हा निकाल लागल्यावर राज्यपालच उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीत एनडीएच्या उमेदवाला पाठिंबा दिला आहे. त्याचेही जयंत पाटील यांनी समर्थन केले आहे. नेहमीच त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्या उमेदवारालाच त्यांनी पाठिंबा दिलेला आहे.यापूर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्याआधी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
गुरु पौर्णिमेच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, पहा काय आहे तुमच्या शहरातील सोन्याचा भाव
शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यमुळे काँग्रेस नाराज; थोरात म्हणाले, पाठिंबा देण्याआधी…
‘ग्रीन टी मधून गुंगीचे औषध देऊन…’, श्रीकांत देशमुखांचा मोठा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now