आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा होता. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर आज सुनावणी पार पडली. राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष मोठ्या खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवला जाण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. आता 1 ऑगस्टला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. तसंच मंगळवारपर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आदेश दिले आहे.
यावरून आता राजकारण तापलं आहे. कोर्टाच्या निकालावर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला अभिमान आहे की हा जो सर्व प्रकार झाला आहे, त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. त्यात कोर्ट तातडीने तारखा देत आहे, असं पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील पाटील म्हणाले, ‘अरुणाचल प्रदेशसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीतही लागू शकतो, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मोठं विधानही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केलं.
आज कोर्टात काय झालं..?
आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या 5 याचिकांवर सुनावणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे , निरज कौल यांनी युक्तिवाद केला.
तर शिवसेनेच्या वतीने वकिल कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती, ज्यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदेगटासोबत, जिल्हाप्रमुख ढसाढसा रडत म्हणाले शिवसैनिक माफ करणार नाहीत
90 च्या दशकात तरुणाईला भुरळ घालणारी RX100 ‘या’ तारखेला पुन्हा येणार बाजारात; यामाहाने केली घोषणा
Rishabh Pant: ‘चले तो चाँद तक नहीं तो शाम तक’, ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने उडवली पंतची खिल्ली
‘या’ पती-पत्नीला पुर्ण देश करतोय सलाम, कलयुगात अशी मुलं मिळणं कठीण, सुनेनं जिंकलं मन