देशभरात सध्या एकाच चित्रपटाची चर्चा रंगली आहे, तो चित्रपट म्हणजे काश्मीर फाइल्स. प्रेक्षक, कलाकार, या चित्रपटावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. या चित्रपटाला आता राजकीय वळण येताना दिसून येत आहे, कारण आता यावर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देत आहे. (jayant patil on the kashmir files)
सध्या अधिवेशन सुरु आहे, त्या अधिवेशनातही आता काश्मीर फाइल्स चित्रपटावर शाब्दिक वाद झाला आहे. हा शाब्दिक वाद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात झाला आहे. त्यांचा हा वाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे,
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डंके चोटपर सांगतो काल आम्ही सर्वजण द काश्मीर फाइल्स बघायला गेलो होतो. त्यामुळे आम्ही विधानसभेत नव्हतो, त्यावर जयंत पाटलांनीही उत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. मध्यांतरानंतर तो सिनेमा बोरींग असल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे.
काश्मीर फाइल्स हा सिनेम बोरींग आहे. तुम्ही तो बघायला गेला यावर माझं म्हणणं नाही. फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले. त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी तिथे चांगलाच गोंधळ घातला आहे.
अधिवेशनात बोलताना विरोधकांना बोलायला वेळ दिला जात नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते. त्यावर फडणवीस म्हणाले, आम्ही काश्मीर फाइल्स पाहायला गेलो होतो, डंके की चोट पाहायला गेलो होतो. त्यानंतर जयंत पाटलांनी त्यांची फिरकी घेतली आहे.
जेव्हा जयंत पाटील यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून डिस्टर्ब करायला लागले. त्यावेळी जयंत पाटील खुप संतापले. ते म्हणाले, आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर मग बोलू नका. जयंत पाटील पहिल्यांदाच सभागृहात संतापलेले दिसले.
महत्वाच्या बातम्या-
३७० कलम हटवल्यामुळे काश्मीरची लेक झाली महाराष्ट्राची सून; भारतीय जवानाची लव्हस्टोरी चर्चेत
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
खेळायच्या वयात मुंबईच्या मुलाने उभी केली करोडोंची कंपनी, २०० जणांना दिल्या नोकऱ्या, वाचा यशोगाथा






