शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. (jayant patil on eknath shinde and shivsena mla)
अशात महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही प्रयत्न सुरु आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिंदे गटानं अद्यापही पाठिंबा काढलेला नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अजूनही मजबूत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार नाराज आहे. परंतू अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही. त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे. सरकारचं कामकाज सुरु आहे. सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, असं काही दिसत नाहीये, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीसोबत नको अशी भूमिका बंडखोर आमदारांची आहे, असे प्रसारमाध्यमे दाखवत आहे. त्यांना वेगळं व्हायचं असेल, त्यामुळे काही कारणं द्यावी लागतात, त्यानुसार ते कारणं देत आहे. आम्हीही अशी कारणं देऊ शकतो, पण तसं आम्ही करणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच सरकारचा पाठिंबा कुणी काढलेला नाही. तुम्ही पाठिंबा काढलाय असं माध्यमांवर का दाखवताय? असा सवालही जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना विचारला आहे. एकनाथ शिंदे अजून मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये काही वेगळं आहे, असे काही वाटत नाही. जे गेले ते परत येतील. सरकारचा पाठिंबा कोणी काढून घेत नाही, तोपर्यंत सरकारला कोणतीही भिती नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या धमकीवर जयंत पाटलांनी भाष्य केले आहे. नारायण राणे यांना कितीतरी वेळा पवारसाहेबांनी संकटकाळात सहकार्य केले आहे. पाठिंबा दिला आहे. त्याचे स्मरण जरी केले तरी त्यांना आपले विधान मागे घ्यावेसे वाटेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! गुवाहाटीत आसाम पोलिसांकडून शिवसेना नेत्याला अटक
मुलगा आणि मुलीचा मृत्यु डोळ्यादेखत पाहिल्यानंतर शिंदेंनी सोडले होते राजकारण, वाचा संपुर्ण कहाणी
नदीत उडी मारला आली नाही म्हणून तिने घेतला गळफास, व्हिडीओ रेकॉर्ड करून सांगितली कहाणी