Share

‘जय भवानी’ घोषणा बाबासाहेबांचीच, पुरावे दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा

prkasha ambedkar

शनिवारी (काल) देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. राज्यात दरवर्षी शिवजयंतीनिमित्त (19 फेब्रुवारी )रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. काल मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी करून, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. (jay bhawani announcement was first given by dr babasaheb ambedkar)

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. तसेच बाबासाहेबांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते, असे ते म्हणाले.

तसेच याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत.

याचबरोबर त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज,महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. त्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या अनुयायांनी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार केला होता, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याबाबत ज्येष्ठ साहित्यिक रमेश शिंदे यांनी म्हंटले आहे की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वेळच्या लेटरहेडवर ‘जय भवानी’ असे लिहिले होते. तशी पत्रेही माझ्याकडेही उपलब्ध आहेत; परंतु ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम बाबासाहेबांनी दिलेली नाही.’

महत्त्वाच्या बातम्या
‘जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत तेवढ्या एकदाच देऊन टाका रोज माझ्या आईला त्रास नको’, सोमय्यांचा राऊतांना टोला
भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; नवरदेवासह 9 जणांचा भयावह अंत
देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु**लोकांना संपवून टाकेल; संजय राऊतांची जीभ घसरली
एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका; ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण…’,

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now