Share

हेच का ‘सब का साथ?’ शेकडो महिलांच्या ऑनलाईन लिलावावरून जावेद अख्तरांचा मोदींना सवाल

Javed Akhtar

आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांनी शेकडो महिलांचा ऑनलाईन लिलाव आणि धर्म संसद प्रकरणावर आपले मत मांडले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

जावेद यांनी ट्विट करत लिहिले की, ‘शेकडो महिलांचा ऑनलाईन लिलाव होत आहे. तथाकथित धर्म संसद, सैन्य आणि पोलिसांना जवळपास २०० मिलियन भारतीय लोकांच्या नरसंहाराची सल्ला देत आहे. मी त्या प्रत्येकाच्या मौनाने मुख्यत्वे पंतप्रधानांच्या मौनामुळे हैराण आहे. ‘सब का साथ’ म्हणजे हेच का?

जावेद यांच्या या ट्विटमुळे अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काही लोक जावेद यांना ट्रोलही करत आहेत. एकाने लिहिले की, ‘अख्तर साहेब तुम्ही याच लायकीचे आहात. जेव्हा ओवैसीने ८० कोटी हिंदूंना धमकी दिली तेव्हा तुम्ही त्याचा विरोध केला नाही. जेव्हा काश्मिरी पंडितांचा नरसंहार झाला तेव्हा तुम्ही गप तमाशा बघत बसलात. ही चुक तुमची नाही, तुमच्या नावाची आहे’.

ट्विटरवर जावेद यांना ट्रोल करण्यात आल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत आपले म्हणणे मांडले. जावेद यांनी लिहिले की, ‘ज्या क्षणी मी मुस्लिम महिलांच्या ऑनलाईन लिलाविरुद्ध आवाज उठविला तेव्हापासून गोडसेचा गौरव करणारे, लष्करी पोलिसांना नरसंहाराचा संदेश देणारे आणि काही धर्मांध लोक माझ्या आजोबांविरूद्ध चुकीचे शब्द वापरत आहेत’.

‘माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली होती. या शिक्षेदरम्यानच १८६४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. अशा व्यक्तीविरूद्ध वाईट बोलणाऱ्या या मुर्ख लोकांना काय म्हणायचे?’

https://twitter.com/Javedakhtarjadu/status/1478200552940916736?s=20

काय आहे बुल्ली बाई अॅप प्रकरण ?

बुल्ली बाई नावाच्या एका अॅपवर शेकडो मुस्लिम महिलांचे मॉर्फ्ड फोटो अपलोड करण्यात आले होते. त्यानंतर गिटहब (Github) नावाच्या होस्टिंग प्लॅटफॉर्मवर ते लॉन्च करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकरण समोर आला होता. त्यानंतर काही महिलांनी याबाबत आवाज उठवत अॅपच्या डेव्हलपरवर कारवाई करण्याची मागणी केली.

महत्त्वाच्या बातम्या : 

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी
‘तुम्ही शाहरूखच्या देशाच्या आहात, तुमच्यावर भरोसा आहे’ म्हणत परदेशी फॅनने केली महीलेला मदत
VIDEO: किचन कल्लाकारमध्ये राजकीय नेत्यांची हजेरी; पंकजा मुंडे, रोहित पवारांनी केली धमाल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now