Share

भारताने मित्र गमावला, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गोळ्या झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता, यासोबतच त्यांचा खुप रक्तस्त्राव झाला होता.

६७ वर्षीय शिंजो आबे यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते, मात्र डॉक्टरांना यात यश आले नाही. शिंजो आबे यांना गोळ्या घालणारा मारेकरी पकडला गेला आहे. हल्ल्यानंतर लगेचच त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. जपानी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने सांगितले की त्याला शिंजो आबे यांना मारायचे होते कारण तो शिंजोंनी केलेल्या अनेक गोष्टींवर समाधानी नव्हता.

संशयित मारेकऱ्याचे वय 41 च्या जवळपास आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया आहे. हल्लेखोर सेल्फ डिफेन्स फोर्सचा सदस्य होता. घटनास्थळावरून ज्या बंदुकीतून हल्ला करण्यात आला, ती बंदूक जप्त करण्यात आली आहे. ती शॉटगन आहे. यामागामी तेत्सुया हा नारा सिटीचा रहिवासी आहे. वृत्तानुसार, संशयित हा सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये राहत होता. 2005 पर्यंत सुमारे तीन वर्षे त्याने तेथे काम केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान यामागामी तेत्सुयाने सांगितले की, त्याला माजी पंतप्रधानांच्या काही गोष्टींचा राग होता आणि त्याला त्यांना मारायचे होते. हल्लेखोराने या हल्ल्याची आधीच योजना आखली असावी असा संशय आहे. कारण शिंजो आबे हे आज नारा शहरात येणारच होते.

गुरुवारीच लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांच्या समर्थकांना ही माहिती दिली. माजी पंतप्रधान जपानच्या नारा शहरात प्रचार करत असताना जपानमध्ये ही घटना घडली. रविवारी येथे वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे. शिंजो आबे यांच्या भाषणादरम्यान हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीतून आरपार झाली.

दुसरी त्यांच्या गळ्यावर लागली. यानंतर ते तेथे पडले आणि आजूबाजूला चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, शिंजो यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर घटनास्थळी त्यांना सीपीआर देऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना वाचवता आले नाही.

शिंजो आबे यांनी 2020 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. प्रकृती खालावल्याने त्यांनी राजीनामा देण्याचे ठरवले होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळाली. शिंजो हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले आहेत. शिंजो आबे यांचा भारताशी विशेष संबंध होता. त्यांच्या पंतप्रधानपदी भारत-जपान संबंध अधिक दृढ झाले. नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग हे दोघेही शिंजो आबे यांना आपले मित्र मानत होते. गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरवले होते.

महत्वाच्या बातम्या
भारताचा जगभरात डंका! भारतीय वंशाचा ‘हा’ व्यक्ती होऊ शकतो ब्रिटनचा नवा पंतप्रधान, वाचा त्याच्याबद्दल..
एकीकडे पाठिंबा दुसरीकडे विरोध! मनसेचे शिंदे सरकारला आव्हान, म्हणाले, तुमच्यात हिंमत असेल तर..
मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता कोल्हापूर, सांगलीतील…
आम्ही कारमध्ये सेक्स केला अन्.., लग्न झाल्यानंतर मीरा राजपूतने केलेल्या खुलशाने शाहिदही अवाक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now