महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच जिथे जिथे अजान भोंग्यांवर वाजेल तिथे तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले होते. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. (jama mashid trust want loudspeaker for kakad aarti)
असे असताना बऱ्याच ठिकाणी दोन्ही धर्मांनी समजूतदारपणा दाखवला. परिस्थिती बिघडू नये म्हणून शिर्डीतील जामा मशिदीने महत्वाचा निर्णय घेतला. पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर होणार नाही. पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारचे भोंगे बंद करु नका. त्यावेळी भोंगे सुरुच राहू द्या, असे म्हणत जामा मशिदींतील विश्वास्तांनी मनाचा मोठेपणा दाखवला.
अजानसाठी मशिदीत भोंगे लावणार नाही, पण साईबाबांची काकड आरती भोंग्यांवरच होऊ द्या, अशी भूमिका जामा मशिदींतील विश्वास्तांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. तसेच त्यांनी याबाबत पोलिसांना विनंतीही केली आहे.
शिर्डीतील मुस्लिम समाजानं आणि जामा मशिद ट्रस्टनं काकड आरती, शेजारती भोंग्यावरच व्हावी. त्यावेळी भोंगे बंद केले जाऊ नये, अशी मागणी केली आहे. शिर्डी हे सर्वधर्म समभावाचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असले तरी शिर्डीत अनेक ठिकाणी धर्मांचा समजूतदारपणा पाहायला मिळत आहे.
राज्यात सध्या भोंग्यांचा विषय तापला आहे. त्यामुळे आम्ही भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काकड आरती, शेजारतीच्यावेळी भोंगे बंद केले जाऊ नयेत, असे जामा मशिदीचे ट्रस्ट अध्यक्ष शमुशुद्दीन इनामदार म्हणाले आहे. तसेच त्यांनी पोलिस प्रशासनाला याबाबत पत्रही लिहिले आहे.
दरम्यान, राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर खुपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत देशातील सर्व हिंदूबांधवांना मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवण्यास सांगितला आहे. भोंगे हा धार्मिक नाही, तर सामाजिक विषय आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राम मंदिराच्या उभारणीची संपुर्ण टाईमलाईन, जाणून घ्या कधी पुर्ण होणार राम मंदिराचे काम?
एकाचवेळी ९ मुलांना जन्म देऊन एक वर्षापुर्वी महिलेने केला होता वर्ल्ड रेकॉर्ड, आता ती कुठं आहेत?
रविंद्र जडेजाला बाद केल्यानंतर हर्षल पटेलने केला जल्लोष, दोन वर्षांनंतर घेतला ‘असा’ बदला