Share

२०२१ मध्ये ‘या’ साऊथच्या चित्रपटांनी घातला धुमाकूळ, कमावला बक्कळ पैसा आणि प्रेक्षकांचे प्रेम

कोरोना महामारीमुळे सन २०१९ हा वर्ष जगभरातील लोकांसाठी नुकसानदायक ठरला होता. या महामारीमुळे अनेक इंडस्ट्रीज कित्येक दिवस बंद होते. अनेक लोक याकाळात बेरोजगार झाले होते. इतर क्षेत्राप्रमाणे मनोरंजन सृष्टीलाही कोरोनामुळे मोठा फटका बसला होता. कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. तसेच सिनेमागृह बंद असल्याने सिनेमागृह मालकांनाही याचा मोठा तोटा सहन करावा लागला होता. एकंदरीत कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी संपूर्ण सिनेसृष्टीचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही २०२१ हा वर्ष चित्रपटांसाठी चांगला ठरला आहे. हे केवळ परिस्थिती पुर्वपदावर आल्याने नाही तर या काळात अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यामध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांचा नाही तर इतर भाषेतील चित्रपटांचाही समावेश आहे. आज आपण या लेखाद्वारे त्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया जे बॉलिवूड चित्रपट नाहीत. परंतु, या चित्रपटांची देशभरात चर्चा झाली आणि त्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

१. जय भीम – (तमिळ)

टी. जे. न्यानवेल लिखित आणि दिग्दर्शित ‘जय भीम’ हा चित्रपट मागासवर्गीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा देणाऱ्या वकिल चंद्रू यांच्यावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता सूर्याने वकिल चंद्रूची भूमिका साकारली होती. यामध्ये दाखवण्यात आले की, वकिल चंद्रू यांनी एका महिलेचा खटला लढला जिच्या पतीला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. चित्रपटात दाखवण्यात आले की, वकिल चंद्रू यांनी मागासवर्गीय लोकांसाठी कशाप्रकारे लढा दिला आणि पैसे न घेता त्यांनी त्या लोकांना न्याय मिळवून दिला.

Jai Bhim Movie

२. द ग्रेट इंडियन किचन – (मल्याळम)

‘द ग्रेट इंडियन किचन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जियो बेबी यांनी केलं आहे. यामध्ये सूरज वेंजारामुडू आणि निमिषा संजयन या कलाकारांनी पती पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट म्हणजे एका नवविवाहित महिलेची कथा आहे. यामध्ये दाखवण्यात आले की, एक नवीन लग्न झालेली मुलगी एक चांगली पत्नी आणि सून बनण्यासाठी कशाप्रकारे संघर्ष करते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती महिला तिचा पती आणि कुटुंबीयांच्या सेवेत मग्न असते. परंतु, सर्व काही सामान्य असे वाटत असलेल्या गोष्टींचा तिला कंटाळा येऊ लागतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना मोडीत काढत ती स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. महिला केवळ चूल आणि मूलसाठीच मर्यादित नाही तर त्यांचाही वेगळा अस्तित्व असतो, हे सांगण्याचा या चित्रपटात प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचे कथानक वास्तववादी भूमिका मांडणारी असून ती प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडते.

३. मास्टर – (तमिळ)

तमिळ सुपरस्टार विजय अभिनित ‘मास्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात दाखवण्यात आले की, जेडी एक मद्यपी कॉलेज प्रोफेसर असतो. ज्याची बाल सुधारगृहात मास्टर म्हणून रवानगी करण्यात येते. तिथे गेल्यानंतर त्याला समजते की, बालसुधारगृहाच्या नावावर एक मोठा रॅकेट चालवण्यात येत आहे. अनेक गुन्ह्यात निष्पाप मुलांना अकडवले जात आहे. गुंडा भवानीद्वारे हे रॅकेट चालवण्यात येत आहे. तर जेडी या सर्वांचा सामना कसा करतो आणि त्या निष्पाप मुलांना यातून बाहेर कसा काढतो, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

४. पुष्पा – (तेलुगू)

दाक्षिणात्य अभिनेता स्टायलिश स्टार अल्लू अर्जून अभिनित ‘पुष्पा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. हा चित्रपट आंध्रप्रदेशमधील शेषाचलम भागातील लाल चंदन तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनने पुष्पा राज नावाच्या ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. एका सामान्य मजूर चंदन तस्करीचा मालक कसा बनतो हे या चित्रपटात रंजकपणे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील अल्लू अर्जूनचे डायलॉग, स्टाईल आणि जबरदस्त अक्शन प्रेक्षकांचे शेवटपर्यंत मनोरंजन करतात.

५. जोजी – (मल्याळम)

मल्याळम अभिनेता फहाद फासिल अभिनित ‘जोजी’ या चित्रपटाचे कथानक कोरोना काळात चित्रित करण्यात आलेला आहे. दिलीश पोथन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये दाखवण्यात आले की, कुट्टीपन पिके नावाचा एक वृद्ध व्यक्ती आणि त्याची तीन मुले असा त्यांचा एकत्रिक कुटुंब. यामध्ये तिसरा मुलगा फहाद फाजिल म्हणजे जोजी, ज्याचं इंजिनियरिंगचं शिक्षण अर्धवट झालेलं असतं. पण त्याची स्वप्ने खूप मोठी असतात. त्याचे वडिल त्याला नेहमी अपयशी म्हणून टोमणा मारत असतात. अशात एक साधारण दिसणारा मुलगा चलाखीने खून करणाऱ्या अपराधीच्या रूपात कसा बदलतो, हे या चित्रपटात रंजकपणे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट प्रत्येकवेळी पुढे काय होणार, ही प्रेक्षकांची उत्कंठता वाढवत नेतो.

६. कर्णन – (तमिळ)

अभिनेता धनुष अभिनित ‘कर्णन’ चित्रपटाचे दिग्दर्शन मारी सेल्वराज यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कथानक दोन गावांमधील जातीव्यवस्थेवर आधारित संघर्षाची कहाणी आहे. यामध्ये दाखवण्यात आले की, एका गावातील लोकांना त्यांच्या सामाजिक अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले. आणि दुसऱ्या गावातील लोकांद्वारे त्यांना नेहमी त्रास देण्यात येते. मात्र, हे सर्व कर्णन नावाच्या तरूणाला मान्य नसते. त्यामुळे तो या अन्यायाविरूद्ध कसा लढतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बिग बॉस मराठीच्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली मोठी ऑफर; आनंद शिंदेंच्या नव्या गाण्यात झळकणार?

आई, भाऊ, बायको, मुलगी सगळे सोडून गेल्याने कपिल शर्मा शोमधील कलाकाराने घेतले विष
पाद विकून आठवड्याला ३७ लाख कमावणे पडले महागात, आता महिलेची ‘अशी’ झालीये अवस्था

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now