दिल्लीच्या जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या मिरवणूकीमध्ये हिंसाचार झाला होता. यावेळी दगडफेकी सोबतच दोन गटातील लोकांमध्ये गोळीबारही झाला होता. ज्यामध्ये पोलिसांसोबत १० जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. (jahangirpuri buldozers action photos)
रविवारी झालेल्या या जातीय हिंसाचारानंतर दिल्लीत महापालिकेला अचानक जाग आली आणि त्यांनी आपल्या क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही कारवाई सुरु होती. पण त्यानंतर काही वेळाने ती कारवाई थांबवण्यात आली. जवळपास तीन तास ही कारवाई सुरु होती. यावेळी अनेक लोकांनी त्यांना विरोध केला पण पोलिस त्यांच्यावर कारवाई करत होते. यावेळी अनेकजण रडतानाही दिसत होते.
जेव्हा पोलिस त्या बेकायदेशीर बांधकांवर कारवाई करत होते. त्यावेळी तिथल्या नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही आपली कारवाई थांबवण्यास तयार नव्हते. त्यावेळी पोलिसांनी त्या लोकांनी तिथून हटवले. तसेच कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरच कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी त्यांना दिला होता.
जहांगीरपुरीमध्ये जेव्हा एका बेकायदेशीर दुकानावर एमसीडीचे बुलडोझर चालवले जात होते. तेव्हा एक महिला रडत होती आणि ओरडत होती. ती दुकान त्या महिलेची असल्यामुळे ती ही कारवाई थांबवण्याची विनंती त्या पोलिसांना करत होती, पण तरीही पोलिस आपली कारवाई थांबवण्यास तयार नव्हते.
यावेळी जहांगीरपुरीमध्ये मशिदीच्या पुढे काही दुकानांनी अतिक्रमण केलेले होते. तिथे असलेली एक दुकानही तोडण्यात आली होती. मशिदींच्या समोरच अतिक्रमणमध्ये आलेल्या एका भिंतीलाही तोडण्यातही आले आहे. ही कारवाई जवळपास तीन तास सुरु होती. त्यानंतर सीपीआय नेत्या वृंदा करात त्याठिकाणी पोहचल्या आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची प्रत दाखवत ही कारवाई थांबवली.
महत्वाच्या बातम्या-
आज फक्त कार्यालयात घुसलोय, उद्या घराघरात घुसू; ब्राम्हण महासंघाची राष्ट्रवादीला थेट धमकी
प्रियांका चोप्राच्या मुलीच्या नावात आहे ‘या’ खास व्यक्तीचा उल्लेख, जाणून घ्या
हार्दिकचे मसल्स पक्षासारखे पातळ, त्याच्यात गोलंदाजी करण्यासाठी जीव नाही, पाकिस्तानी गोलंदाजाचे बेताल वक्तव्य