बुधवारपासून सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत होता. त्या फोटोत एक लहान मुलगा दुकानाच्या ढिगाऱ्यातून काही वस्तू गोळा करताना दिसत होता. फोटोत दिसते की तुटलेल्या दुकानाचा ढिगारा आणि सामान आजूबाजूला पडलेले आहे. एका रिपोर्टरने मुलाला विचारले की तू या वस्तू का गोळा करत आहेस, तर तो मुलगा दुःखी मनाने म्हणतो की, या नाण्यांमधूनच आमचे दुकान आणि घर चालायचे. (jahangirpuri aasif viral video)
जहांगीरपुरी येथील उत्तर दिल्ली महानगरपालिकेच्या कारवाईनंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले होते. जहांगीरपुरीमध्ये १६ एप्रिलला हनुमान जयंतीला हिंसाचार झाला होता. यानंतर एमसीडीने हिंसाचाराच्या ठिकाणी बेकायदा मालमत्ता आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याची घोषणा केली.
त्यानंतर एमसीडीने २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कारवाई सुरू केली. त्यांनी बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला होता. याशिवाय तेथील दुकानांवरही बुलडोझर चालवण्यात आला. येथे मशिदीजवळ बांधलेले अवैध दुकान पाडण्यात आले. एवढेच नाही तर एमसीडीने मशिदीचे गेटही तोडले.
त्यावेळी आसिफ नावाचा मुलगा तिथे पडलेली नाणी आणि दुकानातले सामान गोळा करताना दिसला. पत्रकाराने तो काय करत आहे, असे विचारले असता त्याने सांगितले की, यातून आमचे घर, दुकान चालते. मी शाळेत जातो आणि घरकाम करतो. एमसीडीच्या कारवाईत आसिफचे वडील अकबर यांचे दुकान फोडले होते.
@Abhinav_Pan भाई आपका बहुत बहुत शुक्रिया आपकी मेहनत रंग लाई आसिफ को मदद मिल गई है अब उसे और पैसे नही चाहिए
शुक्रिया @Abhinav_Pan भाई 💐 pic.twitter.com/Am0b1LBxNN— Mudassir Mehndi (@mehndimudassir) April 22, 2022
त्यानंतर आसिफचा हा फोटो चांगलाचा व्हायरल होऊ लागला आणि अनेकांनी त्याला मदतही केली. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो सर्व लोकांचे आभार मानताना दिसून येत आहे. लोकांनी त्यांना २२ एप्रिलपर्यंत तब्बल सहा लाखांची मदत केली आहे.
लोकांच्या मदतीवर बोलताना आसिफने सर्वांचे आभार मानले आहे. मी माझे आईवडिल आता खुप आनंदी आहे. आमच्या मदतीसाठी जेवढे पैसे लागत होते, तेवढे झाले आहे, आता प्लिज आम्हाला अजून पैसे नका पाठवू, असे आसिफने म्हटले आहे. यावेळी त्याच्या वडिलांनीही सर्वांचे आभार मानले आहे.
आसिफचे वडील अकबर यांनी सांगितले की, जेव्हा एमसीडीने त्यांना परवाना दिला तेव्हा त्यांनी दुकानात फ्रीज लावला होता. पण बुलडोझरने सर्वकाही तोडले. त्यामध्ये एकूण ८० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच त्यांचा पैसे कमवण्याचा मार्गच बंद झाला होता.
महत्वाच्या बातम्या-
नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले…
भाजपा लागला २०२४ च्या निवडणूकांच्या तयारीला; जाणून घ्या काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन….
चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच उचलले एटीएम; पहा सीसीटिव्हीत कैद झालेला खतरनाक व्हिडीओ