Share

जडेजाने धोनीबद्दल घेतलेला ‘तो’ निर्णय पडला महागात; गमवावा लागला पहिलाच सामना

महेंद्रसिंग धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडल्यानंतर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले आहे. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा केकेआरविरुद्धचा पहिला सामना हरला. केकेआरने हा सामना ६ विकेटने जिंकला. (jadeja wrong decision about ms dhoni batting)

अशात केकेआरविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आपला जुना फिनिशिंग टच दाखवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने एकवेळ ६१ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर धोनीने क्रीझवर येऊन चेन्नईला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

धोनीने ३८ चेंडूत ५० धावा केल्या, ज्यात त्याच्या एका लांब षटकाराचा समावेश होता. धोनीने शेवटच्या षटकांमध्ये अतिशय स्फोटक फलंदाजी केली. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. पण हा सामना गमवण्यामागे जडेजाने धोनीबद्दल केलेला संघातील बदल कारण असल्याचे सांगितले जात आहे.

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये उमेश यादवने चेन्नईला पहिला धक्का दिला. ऋतुराज गायकवाड शुन्यावर रन आऊट झाला. केकेआरच्या चांगल्या गोलंदाजीमुळे अर्धी टीम ६१ धावांवरच तंबुत परतली होती.

त्यामुळे या सामन्यातील जडेजाच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. विकेट जात असल्याचे दिसून येत असतानाही कर्णधार रवींद्र जडेजाने आणि कोच स्टीफन फ्लेमिंगने धोनीला फलंदाजीला पाठवले नाही. त्यावेळी रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर आणि शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरला होता.

त्यानंतर शिवम दुबे आऊट झाल्यानंतर धोनी सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. विकेट थांबवण्यासाठी जडेजाने धोनीला फलंदाजीसाठी पाठवायला हवे होते. पण त्याने तसे केले नाही आणि त्याने धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवले. त्यामुळे जडेजाचा हा मोठा बदल संघासाठी नुकसानदायक ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस आमदार सरकारला म्हणाला, मला नको तुमचं घर; जितेंद्र आव्हाडांनी दिले सणसणीत उत्तर, म्हणाले..
हे फक्त धोनीच करू शकतो! पहिल्याच सामन्यात केला आगळा वेगळा विक्रम, सचिन-द्रविडलाही टाकले मागे
सुनील गावसकर यांनी पुन्हा केली भविष्यवाणी, म्हणाले, ‘हा’ खेळाडू करणार ९०० हून अधिक धावा

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now