Share

वाहतूक दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल; वाचा चंद्रकांत पाटील असे का बोलले?

chandrkant patil
नागरिकांडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड आकारतात. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात एकट्या पुण्यात हजारो पुणेकरांकडून कोट्यावधीचा दंड आकारण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे नागरिकांना नेहमी कायद्याचे पालन करावे असे सांगणारे नेते मंडळीच आता कायदे मोडू लागली आहेत.

कायद्या मोडणाऱ्या खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांचा देखील यात नेतेमंडळीत समावेश आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाहन चालकांनी ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे.

तसेच या यादीत आता राज ठाकरेंच्या नावाची भर पडली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई (Punitive action) केली असून या नेतेमंडळींना दंड ठोठवला आहे. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

याबाबत पाटील कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ‘पूर्वी रस्ते चांगले नसल्याने वाहनांचा वेग कमी होता मात्र आता रस्ते चांगले झाल्याने वाहनांचा वेग वाढतो. परंतु आता वाहनांना वेग मर्यादा बंधनकारक केली आहे. ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे. नाहीतर वाहतूक नियमांच्या दंडामुळे घर-दार विकायची वेळ येईल, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे दंड भरला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अजित पवारांनी 27 हजारांचा दंड भरला आहे. तसेच  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर 14 हजार 200 इतका दंड आहे.

याचबरोबर राज ठाकरेंच्या गाडीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हजारोंचा दंड लावण्यात आला आहे. काल राज ठाकरे यांनी वापरलेल्या गाडीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7900 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now