Share

‘भाजपा’ने नोटा वापरल्याने आम्हाला ‘नोटा’पेक्षा कमी मतं : संजय राऊत

sanjay raut

विधानसभा निवडणुकीचे बहुतेक निकाल हाती आले असून पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पाहायला मिळले. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे.

तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं देशभरात पाळंमुळं रोवण्याच्या दृष्टीने तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यांमध्ये शिवसेनेने उमेदवार दिले. पण निवडणूक निकालांमध्ये शिवसेनेचं पानिपत होत आहे.

शिवसेनेने तब्बल शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. पण त्यांच्या एकाही उमेदवाराला चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोव्यात शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष केले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेकडून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो. हे खरं आहे, असे राऊत म्हणाले.

याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘आम्हाला नोटांपेक्षा कमी मतं मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरी उत्तरप्रदेश आणि गोव्यात आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरू राहील. पंजाबमध्ये भाजप एक राष्ट्रीय पक्ष असूनही पराभूत झाला. याचंही भाजपने उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आम्ही गोव्यात एकत्र येऊन लढण्याचा खूप प्रयत्न केला, नक्कीच फायदा झाला असता. उत्तर प्रदेशमध्ये देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी आमची अपेक्षा होती. पण तिथेही आम्हाला यश मिळालं नाही. भविष्यात आम्ही विरोधी पक्ष एकत्रितपणे देशभरात कशा प्रकारे काम करता येईल, यासाठी चर्चा करू, असे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
तो नेहमीच अतिउत्साही होतो पण.., झुंड पाहून भावूक होणाऱ्या आमिर खानवर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया
“भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे”
उत्तरप्रदेश निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा झाला का? निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर
आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now