राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. शिवसेना नेते आणि त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.
त्यातच, केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईंवरुन शिवसेनेला प्रश्न विचारले जात आहेत. अशातच मंगळवारी (काल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असे ट्विट करत राऊत यांनी यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.
दररोज विरोधकांवर तुटून पडणारे राऊत अचानक का शांत झाले? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला. राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान संजय राऊत यांनी थोडा उशीर केला अशाप्रकारच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या आहेत.
त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिणीशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपला लक्ष केले. ते म्हणाले, “भाजपचे लोक ध चा मा करण्यात पटाईत आहेत. मी काल काही विषयावर बोलणं टाळलं. एखाद्या विषयावर रोज बोललंच पाहिजे असं नाही,” असे म्हणत त्यांनी त्यांच्या ट्विटवर भाष्य केले.
याचबरोबर ‘भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे. त्यामुळे काल त्यांनी बरेच पतंग उडवले. मात्र संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणीही बंद करु शकणार नाही. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेली माणसं आहोत, असे राऊत म्हणाले.
दरम्यान राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. भाजपा खासदाराने दिल्लीत संजय राऊतांची तब्बल ३ तास भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर भेटीवर राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. “गांधी कुटुंब राजकारणातील महत्त्वाचं कुटुंब आहे. देशासाठी त्याग केलेल्या कुटुंबापैकी ते कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवणं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,’ असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
तरुणांच्या हाती सूत्र देणं काँग्रेसला महागात पडलं; कॉंग्रेस नेत्यानेच केली कानउघाडणी
बहुचर्चित ‘RRR’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
..त्यामुळे ठाकरे सरकार तुरुंगातील कैद्यांना देणार तब्बल ५० हजारांचे कर्ज, गृहमंत्र्यांनी दिली माहिती
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव