Share

युक्रेनच्या युद्धात भारतीयांच्या माणूसकीची दर्शन; इस्कॉनने गरजूंसाठी उघडले मंदिराचे दरवाजे

युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. आता रशियन सैन्य युक्रेनच्या शहरांमध्ये पोहोचले आहे. हवाई हल्ले आणि लष्कराच्या गोळीबारामुळे सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. आतापर्यंत युक्रेनमधल्या सुमारे २५० नागरिकांचा बळी गेला आहे. (iskcon temple open for hungry people)

अशात गुरुवारी युक्रेनमधल्या इस्कॉनची मंदिरे मानवतेचे उदाहरण म्हणून समोर आली आहेत. या गुरुद्वारा आणि मंदिरांमध्ये गरजूंना कोणताही भेदभाव न करता मदत केली जात आहे. भुकेलेल्यांना जेवण दिले जात आहे आणि बेघरांना निवारा दिला जात आहे. रशियन सैन्याच्या क्षेपणास्त्र आणि बॉम्बपासून वाचण्यासाठी लोक येथे येत आहेत.

पोलंडला लागून असलेल्या युक्रेनच्या सीमेवर प्रवास करणाऱ्या भुकेलेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये जेवण दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. खालसा एआयडीचे संस्थापक-सीईओ रविंदर सिंग यांनी ट्विट केलेला व्हायरल व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनमध्ये विद्यार्थी लंगरचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये विविध देशांतील अनेक विद्यार्थ्यांचा लंगर भोजन आणि त्यांना झालेल्या मदतीचा उल्लेख आहे.

अलीकडच्या काळात जिथे जिथे मानवजातीवर संकट आले आहे, तिथे गुरुद्वारांना मानवतेचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. मग तो कोरोना महामारीचा काळ असो वा अफगाणिस्तानातील युद्ध. अफगाणिस्तानच्या संकटाच्या वेळी शीख संघटनांनी त्यांच्या मानवतावादी मदतीसाठी लंगर ठेवले होते. या संस्थेने आपल्या देशातून पळून गेलेल्या अफगाण नागरिकांची सुटका करून त्यांना निवारा, अन्न दिले होते.

आता युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान, इस्कॉनने पूर्व युरोपीय राष्ट्रातील गरजूंसाठी मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. युक्रेनमधील इस्कॉन मंदिरे गरजूंना सेवा देण्यासाठी तयार आहेत. आमचे भक्त संकटात सापडलेल्या लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. आमच्या मंदिराचे दरवाजे सेवेसाठी खुले आहेत, असे इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले आहे.

इस्कॉनची युक्रेनमध्ये ५४ हून अधिक मंदिरे आहेत आणि भक्त इतरांना जमेल त्या मार्गाने सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी सकाळी आम्हाला कीवमधील आमच्या भक्तांकडून अपडेट मिळाले आणि भगवान कृष्णाच्या कृपेने ते सर्व सुरक्षित आहेत. तसेच आमची ५४ मंदिरेही सुरक्षित आहेत, असेही दास यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी तरुण-तरुणींना आवाहन करतो की तुम्ही पण लिपसिंक करुन व्हिडिओ बनवा; नरेंद्र मोदींचे अजब वक्तव्य
उल्हासनगरच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे भयानक कृत्य; २९ वर्षीय महिलेला लॉजवर नेले अन्…
रोहित शर्माच्या अपेक्षांवर खरा उतरला ‘हा’ खेळाडू, सामना झाल्यानंतर रोहितने तोंडभरून केले कौतुक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now