रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2022 मध्ये चांगली सुरुवात करता आली नाही. आयपीएलच्या चालू हंगामात संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. लीग राऊंडचे सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जात असल्याने 5 वेळच्या चॅम्पियन संघाकडून अशा कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती.
मुंबई इंडियन्स आज त्यांच्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. पुण्यातील इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. केकेआरने चालू मोसमात आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्समध्ये बोलत असताना इशान किशनने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘रोहित शर्मा जेव्हा सामन्यादरम्यान चूका करतो तेव्हा तो शिवीगाळ करतो आणि शेवटी म्हणतो की मनावर घेऊ नका. हे फक्त सामन्यादरम्यान घडते.
त्याने सांगितले की, एकदा प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मला सामन्यादरम्यान एक किंवा दोन धावा घेण्यास सांगितले होते. पण रोहित माझ्याकडे आला आणि म्हणाला की, तुला जे काही करायचं आहे ते कर. ते खेळाडूंना पूर्ण सूट देतात. इशान किशन म्हणाला की, सामन्यादरम्यान चेंडू जुना झाल्यावर संघाला अनेकदा फायदा होतो. एका सामन्यात मैदानात दवबिंदू पडले होते.
मी बॉल जर जमिनीवर फेकला तर संघाला त्याचा फायदा होईल असे मला वाटले. मी चेंडू गवतावर घासून रोहित शर्माकडे टाकला. काही वेळातच त्याने खिशातून रुमाल काढला आणि चेंडू पुसताना मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा मला माझी चूक कळली.
त्याने सांगितले की, सामन्यादरम्यान रोहित फलंदाजाला गोंधळात टाकण्यासाठी मैदानावर रिकामी जागा सोडतो ज्यामुळे तो त्या ठिकाणी चेंडू मारतो आणि संघाला बळी घेण्याची संधी मिळते. इशान किशननेही भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, आम्ही बऱ्याच दिवसांपासून रोहित शर्मासोबत खेळत आहोत.
कधी-कधी रोहित शर्मा त्याची चेष्टाही करतो. पण विराटसोबत विनोद करत नाही. त्याच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी अजून मिळाली नाही. विराटशी तसे बॉन्डिंग नाही, असे इशान किशन म्हणाला आहे. इशान किशनने टीम इंडियामध्ये आणि आयपीएलमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून लोक त्याला ओळखतात.
महत्वाच्या बातम्या
मुलगी झाली हो मालिका होणार बंद; किरन माने म्हणाले, लढाई संपलेली नाही, मी या भंगारांना सुट्टी देणार नाय
माणसांमध्ये राहत आहेत एलियन्स, पृथ्वीवर हल्ला करण्याची करत आहेत तयारी, प्रोफेसरच्या दाव्याने खळबळ
राजामौलींच्या फीसमोर काहीच नव्हती रामचरण आणि Jr NTR ची फी, वाचा कोणाला किती कोटी मिळाले
सचिनने धरला ‘मी डोलकर डोलकर…’ कोळीगीतावर ठेका, व्हायरल व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान