इशान किशन चालू आयपीएल हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमातही तो मुंबईचाच एक भाग होता. मात्र संघाने त्याला कायम ठेवले नव्हते. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. (ishan kishan most expensive player in IPL)
इशान किशन त्याच्या मुळ किंमतीपेक्षा ७ पट अधिक महाग विकला गेला आहे. मुंबईशिवाय इतर सर्व संघांनी इशानवर जोरदार बोली लावली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खेळाडूवर १० कोटी किंवा त्याहून अधिक बोली लावली आहे.
गेल्या मोसमात त्याला ६.२ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच त्याला सुमारे ९ कोटी रुपये अधिक मिळाले. २३ वर्षीय इशान किशनचा टी-२० मध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने १०४ डावात २८ च्या सरासरीने २७२६ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत.
या यष्टीरक्षक फलंदाजाचा स्ट्राइक रेट १३५ आहे, जो टी-२० च्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. यामुळे ५ वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या टीमने त्याच्यावर एवढी मोठी बोली लावली आहे. त्याने टी-२० विश्वचषकातही प्रवेश केला आबे. अलीकडेच तो रोहितसोबत वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतही ओपनिंग करताना दिसला होता.
आयपीएल लिलावात विकत घेतलेला इशान किशन हा दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. २०१५ मध्ये युवराज सिंग १६ कोटींना विकला गेला होता. मुंबई इंडियन्स हा त्याचा आवडता संघ असल्याचे इशान किशनने पूर्वी अनेकदा सांगितले आहे. यावेळी आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच होऊ शकतात. याचा इशान किशनला खुप फायदा होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सने त्यांचे अनेक स्टार खेळाडू रिटेन केलेले नाही. त्यामुळे त्यांचे अनेक खेळाडू दुसऱ्या संघात जाणार आहे. यात प्रामुख्याने हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक आणि ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे. तर संघाचा कर्णधार रोहित शर्माच असून त्याला मुंबईने रिटेन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
‘जे पुरूष नियमितपणे पॉर्न पाहतात त्यांना किस करता येत नाही’, अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य
“… लक्षात ठेवा आमचे सरकार पडणारही नाही आणि मी झुकणारही नाही, जय महाराष्ट्र!”
हॉटेलच्या रूममध्ये ‘त्या’ अवस्थेत आईने मुलाला पाहिले गर्लफ्रेंडसोबत; आणि पुढे…, वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का