Share

VIDEO: सामना सुरु असतानाच इशान किशनला करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा नक्की काय घडलं

टीम इंडियाचा युवा खेळाडू इशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने इशानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला कांगडा येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (ishan kishan injured video)

आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्चार्ज झाल्यानंतर इशान किशन टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या सामन्यात लाहिरू कुमाराचा एक बाऊन्सर इशान किशनच्या हेल्मेटला लागला, त्यामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला.

त्यानंतर मेडीकल टीमने येऊन त्याची चौकशी केली. यानंतर इशान किशनने फलंदाजी सुरूच ठेवली, मात्र १६ धावांवर तो लाहिरू कुमाराचा बळी ठरला. त्यानंतर ईशान किशनला फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे इशान किशनला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचे सीटी स्कॅन केल्यानंतर खबरदारी म्हणून त्याला जनरल वॉर्डमध्ये नेण्यात आले. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशान किशनला तिसऱ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. बीसीसीआयकडून लवकरच ईशान किशनबाबत अॅडव्हायझरी जारी केली जाईल.

https://twitter.com/rishobpuant/status/1497599164271644672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1497599164271644672%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fsri-lanka-pacer-lahiru-kumara-hit-ishan-kishan-on-his-helmet-watch-video-94738

इशान किशनशिवाय श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंडिमललाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चंडीमलला दुखापत झाली. दिनेश चंडिमल आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यालाही अनुपस्थित राहू शकतो.

दरम्यान, दुसरा टी-२० सामना सात गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा टी-२० सामना केवळ औपचारिकता आहे. तिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघ बेंच स्ट्रेंथ आजमावू शकतो. मोहम्मद सिराज, आवेश खान, मयंक अग्रवाल हे खेळाडू संधीच्या शोधात आहेत.

महत्वाच्या बातम्या-
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत? मकरंद अनासपुरेंसोबत साकारली होती महत्वाची भूमिका
‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राला मिळाली चित्रपटात काम करण्याची संधी, लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार?
नाद केला भावा तू! नवराईला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं; लेकीच्या निरोपासाठी अख्खा गाव जमला

खेळ

Join WhatsApp

Join Now