सध्या कर्नाटकच्या शाळा कॉलेजमध्ये बुरखा प्रकरणावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा-कॉलेजात बुरखा घालून येण्यासाठी विद्यार्थीनी आंदोलन करत आहे. या प्रकरणाचे पडसाद देशभरात पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रातही अनेक मुस्लिम संघटनांनी या प्रकरणी निषेध नोंदवला आहे.
आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोक त्याच्या या ट्विटला कर्नाटकच्या हिजाब वादाशीही जोडत आहेत. इरफान पठाणने ट्विट करून विचारले की, निवडणुका येत आहेत का? सोशल मीडियावर हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
तसेच या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. याला उत्तर देताना एका यूजरने म्हटले की, तुमचा मित्र गौतम गंभीरला विचारा. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफानने बुधवारी सकाळी हे ट्विट केले आहे. त्याने कोणत्याही विषयावर भाष्य न करता फक्त निवडणुका येत आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे अनेकांनी या ट्विटचा संबंध कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाशी जोडला आहे. त्यामुळे अनेकांनी या ट्विटवर कमेंट केल्या आहे.
Election is on the way??
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 9, 2022
इरफान पठाणला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, होय, याच कारणामुळे कर्नाटक संघर्ष करत आहे. त्याचवेळी एका यूजरने सांगितले की, निवडणुकीपूर्वी कोरोना गायब झाला आहे. एका यूजरने उत्तर दिले की, कर्नाटक २०२३ च्या निवडणुकीची तयारी करत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू पठाणला एका यूजरने सांगितले की, निवडणुका येत आहेत की नाही, याबाबत त्याने त्याचा मित्र गौतम गंभीरला विचारावे. एक म्हणाला तुला माहीत नाही? क्रिकेटच्या दुनियेतून कधीतरी बाहेर ये, बघा देशात काय चाललंय. तसेच हे सर्व निवडणूक जिंकण्यासाठी कर्नाटक सरकार करत आहे, असे एकाने म्हटले आहे.
इरफान पठाण गेल्या महिन्यातच क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता. पठाणने लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये इंडिया महाराजा संघाचे प्रतिनिधित्व केले. जागतिक दिग्गज संघाविरुद्ध त्याने २१ चेंडूत १ बळी घेण्यासह ५६ धावांची शानदार खेळी खेळली होती. २ विकेट्स व्यतिरिक्त इरफान पठाणने एशिया लायन्स विरुद्ध नाबाद २१ धावा केल्या.
सध्या कर्नाटकचा हिजाबचा वाद देशभर चर्चेचा विषय राहिला आहे. या वादामुळे कर्नाटक राज्यातील हायस्कूल आणि कॉलेजही ३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे युजर्सनी इरफान पठाणच्या या ट्विटला हिजाबच्या वादाशी जोडले आहे.
महत्वाच्या बातम्या-
महिंद्रा थार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, फक्त ६९१ रुपयांत घरात आणा नवी कोरी कार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई
कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात; मुंबई, मालेगावात मुस्लिम तरुण-तरुणी रस्त्यावर