भारतीय क्रिकेटपटूंमध्येच जुंपली; इरफान म्हणाला मी देशासाठी खेळलोय, मला बोलायची तुझी लायकी नाही

भारतीय संघाचे दोन क्रिकेटपटू इरफान पठाण आणि अमित मिश्रा यांच्यातील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. शुक्रवारी सकाळी इरफान पठाणने भारत देशाबाबत एक ट्विट केले. इरफानचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. यानंतर लेगस्पिनर अमित मिश्राने इरफान पठाणचे नाव न घेता ट्विटला उत्तर दिले. (irfan pathan angry on amit mishra)

इरफानने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले होते, माझा देश, माझा सुंदर देश, माझ्या देशात पृथ्वीवरील महान देश बनण्याची क्षमता आहे, पण…. त्याने हे अर्धवटच लिहिल्यामुळे अमित मिश्राने या ट्विटला उत्तर दिले. त्याने ट्विट केले की. माझा देश, माझा सुंदर देश, माझ्या देशात पृथ्वीवरील महान देश बनण्याची क्षमता आहे. पण राज्यघटना हा आपल्या देशाचा पहिला ग्रंथ आहे हे आपल्याला कळले पाहिजे.

आता इरफान पठाणची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. तुम्हाला लोकं ट्रोल करतात, त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघतात? असा प्रश्न पत्रकाराने इरफान पठाणला विचारला होता. त्यावर त्याने उत्तर देताना म्हटले की, आम्ही देशासाठी खुप पॅशनेट आहे, होतो आणि नेहमी राहणार.

तुम्हाला आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मला ही गोष्ट तेव्हा कळाली. जेव्हा मी सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर माझे मत मांडायला लागलो. मला एखाद्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर मी बोलतो, असे इरफान पठाणने म्हटले आहे.

तसेच मी कोणतेही व्यक्तव्य केले असेल, तर ते एकतर देशासाठी असेल किंवा देशातील लोकांसाठी असेल. त्याच्यामध्ये माणुसकीसाठी काहीतरी लिहिलेले असते. मी कधीच वाद होतील असे वक्तव्य करत नाही. आम्ही देशासाठी खेळतो, आम्ही देशासाठी खूप पॅशेनेट आहे. याचं एक उदाहरण देतो की, आम्ही देशासाठी खेळतो. संघ चांगला कसा खेळेल याकडे आम्ही लक्ष देतो. कारण आम्हाला जिंकायचं असतं, असे इरफान पठाणने म्हटले आहे.

तसेच मी देशासाठी खुप पॅशनेट आहे आणि यावरुन माझ्यावर कोणी प्रश्न उपस्थित नाही करु शकत. तसंच माझ्यावर प्रश्न उपस्थित करण्याची कोणाची लायकी पण नाहीये. आम्ही आपल्या देशाचा झेंडा पाकिस्तानातही गाडला आहे आणि साऊथ आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही गाडला आहे, असे इरफान पठाणने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
योगींचा एक आदेश अन् लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले; १७ हजार ठिकाणी ‘आवाज’ झाला कमी…
‘मी हिच्यासाठी मरत आहे’; प्रेयसीचा फोटो ठेऊन स्टेटस टाकले अन् मृत्यूला कवटाळले
“रावणाने नव्हे तर रामानेच सीतेला पळवून नेण्याचा प्लॅन आखला होता”; वक्तव्याने खळबळ