Share

IPL २०२२ चा महाराष्ट्रात धुमाकूळ, ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने होणार पुण्यात; वाचा कधी आहे फायनल

ज्या गोष्टीची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, त्या आयपीएलला लवकरच सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार दुप्पट होणार आहे. तसेच यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आणि टेन्शन पाहायला मिळणार आहे. (ipl in mumbai and pune)

आयपीएल मेगा लिलाव यशस्वी झाला, जिथे अनेक खेळाडूंना फ्रँचायझींनी मोठी रक्कम देऊन निवडून आणले. आता सर्वांचे लक्ष आयपीएल २०२२ वर लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी २० लीगचे सामने २६ मार्चपासून सुरू होऊ शकतात आणि अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाऊ शकतो. बहुतांश सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुण्यातही सामने होऊ शकतात.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, कोरोना महामारीमुळे बहुतांश सामने महाराष्ट्रात होणार आहेत. साखळी फेरीत एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन ठिकाणी एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

तसेच पुण्यात १५ सामने होणार आहेत. सर्व १० संघ वानखेडे आणि डीवाय पाटील येथे ४-४ सामने खेळतील. याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्नमध्ये त्यांना ३-३ सामने खेळावे लागणार आहेत. चालू हंगामापासून टी-२० लीगमधील सामन्यांची संख्या ६० वरून ७४ वर पोहोचली आहे. मात्र, प्लेऑफसाठीचा सामना अद्याप निश्चित झालेला नाही.

बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २४ फेब्रुवारीला होणार आहे, त्यात तारखांचा विचार केला जाऊ शकतो. या बैठकीत पूर्ण वेळापत्रक, ठिकाण आणि तारखा यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लिलावात एकूण २०४ खेळाडूंना खरेदी करण्यात आले.

तसेच संघांकडून ३३ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते. म्हणजेच एकूण २३७ खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. यावेळी १० संघ असल्यामुळे भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेत चांगला खेळ दाखवून ते भारतीय संघातही स्थान मिळवू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-
ज्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाला, त्या लॅबचे मालक…; मेधा पाटकरांच्या दाव्याने उडाली खळबळ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी सोपवली भारतीयावर जबाबदारी; जाणून घ्या कोण आहे दलीप सिंग?
जागरण गोंधळात हलगी वाजवणारा बाळू तृतीयपंथी सपनावर झाला फिदा, आता दोघेही करणार लग्न

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now